नगर परिषद अंतर्गत प्रलंबित समस्यांचे काँग्रेस द्वारे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- 

     नगर परिषद अंतर्गत प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिमूर शहर पदाधिकाऱ्यांद्वारे चिमूर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

        समस्यांमध्ये इंदिरानगर येथील पट्टे,घरकुल लाभार्थ्यांचा थकलेला हप्ता,नाली सफाई,घंटागाडीची अनियमितता,अस्वच्छता,वाढलेली काटेरी झुडपे,पाणीपुरवठा योजनाअंतर्गत झालेली रस्त्याची चाळण आदी समस्यांचा समावेश आहे.

       शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी चिमूर मुख्याधिकारी यांचे सोबत निवेदन सादर करीत समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.ततसंबंधाने सविस्तर चर्चा झाली.

               नगर परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांना नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांची माहिती करून देण्याकरिता चिमूर शहर काँग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पु शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

        यावेळी इंदिरानगर येथील नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर होऊनही त्यांना पट्टे मिळाले नसल्यामुळे लाभापासून लाभार्थी वंचित रहावे लागत आहे.

       घरकुल योजने अंतर्गत मंजुर लाभार्थ्यांनी केलेल्या बांधकामांचे हप्ते थकित आहेत.शहरातील व ग्रामीण भागातील नाल्या ४ ते ५ महिने लोटूनही उपसा करण्यात आलेल्या नाहीत याचे वास्तव्य मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले.

          सर्व समस्यांचा गांभीर्यपुर्वक विचार करून लवकरात लवकर निपटारा करावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

       यावेळी माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर,राजु चौधरी,देवा नगराडे,शाहीद खान,विलास मोहीनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.