चिमूर नगरपरिषद अंतर्गत समस्या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मुख्यअधिकाऱ्यांशी चर्चा व निवेदन…

        रामदास ठुसे

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

          चिमूर नगर परिषदअंतर्गत प्रलंबित असलेल्या इंदिरानगर येथील पट्टे, घरकुल लाभार्थ्यांचा थकलेला हप्ता, नाली सफाई, घंटागाडीची अनियमितता, अस्वच्छता, वाढलेली काटेरी झुडपे, पाणीपुरवठा योजनाअंतर्गत झालेली रस्त्याची चाळण आदी समस्याच्या शहर काँग्रेस कमिटीतर्फे मुख्याधिकारी यांचेपुढे चर्चा करण्यात आले तसेच याबाबतचे निवेदन सादर करीत समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

            नगर परिषदेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांना नगरपरिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांची माहिती करून देण्याकरिता चिमूर शहर काँग्रेस मीडिया प्रमुख पप्पू भाई शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

             यावेळी इंदिरानगर येथील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊनही त्यांना पट्टे मिळाले नसल्यामुळे लाभापासून लाभार्थी वंचित रहावे लागत आहे. घरकुल योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थ्यांनी केलेल्या बांधकामांचे हप्ते थकित आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील नाल्या ४ ते ५ महिने लोटूनही उपसा करण्यात आलेल्या नाहीत.

           अनियमित घंटागाडी, गाडीवरील भोगे बंद आहेत. नियमित साफसफाईचा अभाव, शहरात मुख्य मार्गावरील दुभाजकावर वाढलेले काटेरी झाडे तसेच इतरही प्रभागातील वाढलेले झुडपे, नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नळ जोळणी व पाईप लाईन टाकण्याकरिता शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे.

            अशाप्रकारे विविध सर्व समस्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून लवकरात लवकर निपटारा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

           यावेळी माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर, राजु चौधरी, देवा नगराडे, शाहीद खान, विलास मोहीनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.