बिग ब्रेकिंग न्यूज… — सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अभिषेक गावंडे यांचा कणखर निर्णय,प्रशासनाला कंटाळून स्वतःला संपवणार?…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

            दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सूचना फलक उभारणीच्या नावाखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता आणि मा. अ. का. महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पंजाबराव गावंडे यांनी प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

          अभिषेक गावंडे यांनी 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

            गावंडे यांच्या माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे, दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सूचना फलक उभारणीसाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी गैरवापर करण्यात आला आहे. त्यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी पहिल्या तक्रारीद्वारे या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनास सूचित केले होते.

             तथापि, संबंधित विभागाने दोन ते तीन महिन्यांपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, जाणीवपूर्वक विलंब केला. या काळात विभागाने सूचना फलक उभारणीचे काम सुरू ठेवले आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले.

          गावंडे यांनी संबंधित विभागाने स्वतंत्र चौकशी समिती स्थापनेची मागणी केली, परंतु उच्च अधिकारी यांनी अभिषेक गावंडे यांच्या भावनेशी खेळ खेळत या प्रकरणात त्याला चौकशी अधिकारी नेमले जाऊ या प्रकरणात दर्यापुरात भ्रष्टाचार करून गेला.

           प्रकरणाच्या चौकशीसाठी ज्यांना नियुक्ती दिली ती कार्यकारी अभियंता, ज्या व्यक्तीने दर्यापूर येथील भ्रष्टाचारात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आरोप आहेत, त्यालाच चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. यामुळे चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या व्यक्तीला चौकशी प्रक्रियेचे नेतृत्व देणे हे अत्यंत खतरनाक ठरते.

               गावंडे यांनी वारंवार स्मरणपत्रे दिली, तक्रारी सादर केल्या, व वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटी घेतल्या. तरीही यावर कार्यवाही होण्याऐवजी, त्यांनी केवळ उडवा-उडवीची उत्तरं दिली, जे कोणत्याही ठोस कारवाईकडे नेले नाहीत. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे, गावंडे यांनी 26 जानेवारी पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी हे आंदोलन प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात एक महत्त्वाचा संघर्ष मानला आहे.

            गावंडे यांच्या आंदोलनामुळे जनजागृती होईल आणि प्रशासनावर दबाव वाढवेल, अशी अपेक्षा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या लढ्यात केवळ त्यांचा न्याय नाही तर संपूर्ण समाजाचा न्याय आहे. प्रशासनाने तातडीने भ्रष्टाचारावर ठोस कारवाई केली नाही, तर त्याच्या गंभीर परिणामांसाठी प्रशासनच जबाबदार असेल.

प्रतिक्रिया 

          मी गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकरणात सतत पाठपुरावा करत आहे. या प्रकरणात अनेक उच्च पदाधिकाऱ्यांवर टांगती तलवार आहे. अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली, परंतु ती समिती त्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नेमली आहे, जो या भ्रष्टाचार प्रकरणात मुख्य भूमिका बजावत आहे. यामुळे माझ्या तक्रारीला मस्करीत घेतले गेले आहे आणि माझ्या भावनेशी खेळले गेले आहे. त्यांनी माझ्या संघर्षाला हलक्यात घेतले आहे. मात्र, या मस्करीचे उत्तर मी 26 जानेवारी 2025 रोजी नक्की देईन.”

अभिषेक पंजाबराव गावंडे 

जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती जिल्हा