
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनीः- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यापासून ४५ की.मी. अंतरावर बनेरा गाव आहे.
या गावाती जीर्ण झालेले सौरऊजेचे पोल व प्लेट डोक्यावर पडल्यामुळे कु. अंजली रंजीत भलावी वय १७ वर्ष या मुलीला किरकोळ दुखापत झाली.
तिला नरहर येथिल वैद्यकीय अधिकारी कुडवेवाले यांच्या नेऊन उपचार केले.
सदर घटना रविवारी दिनांक १४/१/२०२४ ला सकाळी ९:०० वाजेला घडली असून घटनेची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले याना झाल्यानज त्यांनी तात्काळ मुलीच्या घरी भेट देऊन घटनेबाबत विचारपूस करुन माहीती घेतली.
आणि स्वतः वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी आर्थिक सहकार्य केले व वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क करून उपचार संबधी माहीती विचारली.
या प्रसंगी वन विभागाच्या अधिनस्त कर्मचारी टिम उपस्थित होती.