
युवराज डोंगरे – खल्लार
उपसंपादक
येवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व कै. भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
श्री शंकर महाराज विद्यालय पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग घेऊन पुन्हा प्राथमिक गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याने आता त्यांची राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली आहे.
सहभागी विद्यार्थ्यांनी कु.माधवी रणजित जाधव वर्ग ६ ब आणि कु. तनुश्री गोपाल मोहोड वर्ग ७ अ ह्या प्राथमिक गटातील विद्यार्थिनीनी विज्ञान शिक्षक सुनील तायडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्गासाठी उपयोगी असे मॉडेल “स्वयंचलित सौरऊर्जा कुंपण व स्वयंचलित सौर ऊर्जा जलसिंचन”या विषयावर प्रतिकृती सादर केले होते.
ही प्रतिकृती (मॉडेल )शेतकऱ्यांना फायदेशीर असल्यामुळे त्यांनी जिल्हा स्तरावर देखील प्रथम क्रमांक पटकाविला आणि सोबत सन्मान चिन्ह सुद्धा प्राप्त केले.
त्याबद्दल त्यांचे येवदा शिक्षण संस्था येवदाचे अध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर, सचिव हर्षराज देशमुख, कोषाध्यक्ष प्रदीपभाऊ देशमुख, प्राचार्य निळकंठ बोरोळे , पर्यवेक्षक मोहम्मद अतहर तसेच मनोज देशमुख क्रिडा शिक्षक तथा संचालक व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर,कर्मचारी वृंद विद्यार्थी मंडळी ह्यांनी कौतुक करुन केले.