रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा
वर्धा :- रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ ला लोक महाविद्यालय वर्धा येथे सांस्कृतिक सभागृहात विदर्भ बेलदार समाज(तत्सम जमाती) संघटना व महिला मंडळ जिल्हा शाखा वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री, विदर्भ पुत्र,समाजाचे श्रद्धास्थान स्व.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या १२३ व्या जयंती उत्सव निमित्त नववर्ष स्नेहमिलन, महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन व विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सौ.अरूनाताई कोटेवार,विदर्भ बेलदार समाज महिला मंडळ, जिल्हा शाखा,वर्धा. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. प्रवीण येलचटवार, विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा शाखा वर्धा.मा. विलासराव भिमनवार, अध्यक्ष ते. मु. का. हनुमान देवस्थान ,वर्धा. श्री. सुनील दुंपलवार, उपाध्यक्ष तेलंगपूरा आखाडा ,वर्धा. हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा. सा.कन्नमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा शाखा वर्धा सचिव श्री अमित चिनेवार यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू व संघटनेच्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली
तसेच विदर्भ बेलदार समाज (तत्सम जमाती) संघटना प्रांतीय कोषाध्यक्ष मा. श्री. संजय कोटेवार यांनी प्रांतीय स्तरावर चालणाऱ्या उपक्रमाची माहिती देऊन सर्व समाज बांधवांनी २१ व २२ जानेवारी २०२३ ला चंद्रपूर येथे होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा. डॉ. श्री. विलास भाऊ भिमनवार यांनी कन्नमवार यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन समाज बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन केले तसेच कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी असे मत व्यक्त केले. सोबतच प्रमुख उपस्थिती मा. श्री. सुनील दुंपलवार यांनी बेलदार समाजातील विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सोबतच प्रमुख उपस्थिती मा. श्री. प्रवीण येलचटवार यांनी सामाजिक उपक्रमामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमांमध्ये समाज बांधवांपैकी मा.सुश्री द्वारकाताई इमडवार जिल्हा सचिव अखिल भारतीय किसान सभा जिल्हा वर्धा, मा.श्री. आशिष कुचेवार उपसरपंच ग्रामपंचायत सालोड, मा.सौ. विद्याताई कळसाईत ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत पिपरी या समाज बांधवांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींनी सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजनाला शुभेच्छा देत सर्व समाज बांधवांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे येऊन समाजाचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.
सोबतच वर्ग दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत 80 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या कु. प्रतीक्षा नितेश मैदपवार,श्री. समीरण अनिल आदेवार, कुमारी नुपूर अनुप शंकदरवार, कुमारी दिव्यानी अजय मंथनवार, कुमारी वेदांती राजेंद्र मंथनवार या गुणवंतांचे पारितोषिक देऊन अभिनंदन व गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रीताताई नागिलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.सोनलताई इरटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ बेलदार समाज (तत्सम जमाती)संघटना, वर्धा.विदर्भ बेलदार समाज महिला मंडळ,वर्धा.ते. मू.का. हनुमान देवस्थान, वर्धा. तेलंगपुरा आखाडा वर्धा पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहकार्य केले.