सावली (सुधाकर दुधे)

आज दिनांक.१८ जानेवारी २०२३ ला माजी मंत्री व विद्यमान आमदार.मा.विजयभाऊ वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय सावली येथे तालुका महिला काँग्रेस कमिटी सावली यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ मकर संक्रांती निमित्य हळदी कुंकू, महिला सबलीकरण व भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.तालुका महिला काँग्रेस कमिटी सावली यांच्या संकल्पनेतून सावली शहरातील १७प्रभागातील ७५ विधवा आणी निराधार महिलांना साड्या व लुगड्यांचे वाटप करण्यात आले.

 

 यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार ,पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. १९व्या शतकात भारतीय समाजात स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त होते.तिला त्या काळात अनेक अनिष्ट प्रथांचा सामना करावा लागत असे.सती प्रथा, केशवपन्न, बालविवाह, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला.त्या काळात अनेक कर्तबगार स्त्रियांनी पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून आपली ताकत आपली गुणवत्ता दाखवली.त्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची व समाजातील अनिष्ट प्रथाविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली.

       आम्ही सावित्री- जिजाऊ च्या लेकी या तत्वावर विज्ञान युगातील स्त्रियां या त्या काळातील अनिष्ट प्रथेपुढे जाऊन स्वतःचे अस्तित्व कश्याप्रकारे सिद्ध करते,स्त्रियांनी स्वावलंबी बनण्यासाठी व त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे या कार्यक्रमांचे मुख्य उद्देश होते.

      कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सौ.उषाताई भोयर,तालुकाध्यक्षा महिला काँग्रेस कमिटी सावली तर अध्यक्ष स्थानी सौ.लताताई लाकडे,नगराध्यक्ष न.प.सावली यांनी भूषविले.

       विधवा महिलांना प्राचीन काळापासून त्यांचा अनेक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले.आता विद्यायुगात त्यांचा हक्काची पायमल्ली होणार नाही त्यांना सुद्धा समाजात हक्काचे स्थान मिडाले पाहिजे या साठी क्रांतिज्योती सावित्रीबाई व राष्ट्रमाता जिजाऊ याचे आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातूनच याची सुरवात करावी अशे आवाहन सौ.लताताई लाकडे यांनी उपस्थितांना केला.

         तर सौ.उषाताई भोयर यांनी स्त्री ही अनेक रूपात कार्यरत असते ती कुणाची जननी,बहीण असू असते.तिला घर संसार लागू असते पण त्या पलीकडे जाऊन ,सावित्रीआई व जिजाऊ चे आदर्श घेऊन पुरुषाप्रमाणेच दैदिप्यामान यश संपादन करावे, विधवा महिलांनी सुद्धा कोणतेही अनिष्ठ प्रथानां न जुमनता स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे,यासाठी मार्गदर्शन केले.

 

या प्रसंगी प्रफुल वाळके नगरसेवक,सौ.साधना वाढई नगरसेविका,सौ.सिमा संतोषवार नगरसेविका,सौ.राधा ताटकोंडवार नगरसेविका, सौ.प्रियांका रामटेके नगरसेविका, सौ.ज्योती शिंदे नगरसेविका, सौ.अंजली देवगडे नगरसेविका, सौ.ज्योती गेडाम नगरसेविका, सौ.कविताताई मुत्यालवार,सौ. अंजली दमके,कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया विभाग सावली, गावातील महिला, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सिमाताई संतोषवार व स्वागत सौ.ज्योती शिंदे यांनी केले.तर आभार सौ.अंजलीताई देवगडे यांनी मानले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com