खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कान्होली येथील ७० वर्षीय वृद्धावर काल दि १७ जानेवारीला रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नरदोडा ते कान्होली दरम्यान असलेल्या चंद्रभागा नदी पात्रात घडली.
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कान्होली येथील धनसाजी लकुजी वानखडे हे काल दि १७ जानेवारीला नरदोडा येथे गेले होते. नरदोडा येथे धनसाजी वानखडे यांच्याशी राहुल जनार्धन वानखडे याचा दारु पिऊन वाद व शिवीगाळ झाली. वादानंतर धनसाजी वानखडे हे नरदोडा येथून कान्होलीकडे पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून राहुल वानखडे त्याच्या साथीदारांसह आला व धनसाजीवर चंद्रभागा नदीपात्रात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात धनसाजी गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ज्ञानेश्वर सिडाम, शरद डहाके,परेश श्रीराव, दिलीप इचे यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय,दर्यापूर येथे पाठविले.जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी खल्लार पोलिसात आरोपी राहुल जनार्धन वानखडे व त्याच्या एका साथीदावर कलम 324,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.