नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
नागपूर- प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर शहर/ ग्रामीण च्या वतीने 33 व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने जनजागर कलापथक संच एकोडी /साकोली च्या वतीने नागपूर शहरात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
पथनाट्य सादरीकरण करतांना गाडी चालविताना डोक्यात हेल्मेट घातले पाहिजे, दारू पिऊन गाडी चालवू नये, अतिवेगाने गाडी चालवू नये, गाडी चालविताना मोबाईलचा वापर करू नये, ओव्हर टॅक करणे टाळावे, वाहतुकीचे नियम पाळा ,हे सर्व विषय गीत ,प्रबोधन व पथनाट्या च्या माध्यमातून सादरीकरण केले.
त्यानिमित्ताने कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे मा.रविंद्र भुयार साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर), मा विजय चौव्हाण साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण), मा.रविंद्र काटोलकर शिक्षणाधिकारी, मा. राठोड साहेब शल्यचिकित्सक नागपूर यांच्या उपस्थिती मध्ये भावेश कोटांगले यांचा स्मृतिचिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. सादरीकरण संचात यशवंत बागडे, प्रल्हाद भुजाडे, अरविंद शिवणकर, अरविंद कांबळे, सोनू मेश्राम, अर्चना कान्हेकर, रितू मरसकोल्हे उपस्थित होते.