युवराज डोंगरे/ अमरावती

 

      अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले सदर निवेदनामध्ये शासन परिपत्रकान्वये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी वाळू घाटावरुन बांधकाम करण्याकरीता वाळु काढण्यास परवानगी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या शासन परिपत्रकानुसार लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत ५ ब्रास वाळू उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले आहे . परंतु वाळु उपलब्ध नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम थांबलेले आहे . जिल्हातील प्रत्येक तालुक्यात किमान २ घाट घरकुल योजनेसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे या करीता आपण तसे आदेश निर्गमित करण्या संदर्भाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्यानुसार त्यांच्या अधिनस्त खनिज कर्म विभागाला आदेश देण्याबाबत निवेदनात युवा सेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन देतावेळी म्हटले आहे.

या वेळी अंकुश पाटील कावडकर उपजिल्हा प्रमुख युवासेना, शुभम जवंजाळ, अंकुश सोलव, धीरज जामणिक, सागर वडतकर, अनुप मानकर, स्वप्नील परतिकी कैलास कुलट तसचे शिवसैनिक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com