आरमोरी
तालुका प्रतिनिधी
मौजा वासाळा ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सवानिमित्त दही काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी दही काल्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की,काला हा सर्वसमावेशक असा सर्व जाती धर्म पंथाचा असतो,असा काला सर्व समाजाला जोडून ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य करतो.
ज्याप्रमाणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी “आओ कोई भी धर्मि आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा” असे सांगितलेले आहे त्याप्रमाणेच दहीकाला हा सर्व गुणाचे मिश्रण असलेला जाती धर्म पंथाचा समावेशक काला असतो.
त्यांनी उपस्थित भाविकांना व आयोजकांना या आयोजनाच्या व नवीन वर्षाच्या तसेच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पण दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, अजा विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीपजी घोडाम, आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, अनिलजी किरमे, राजन हिरे व गावातील गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने भावीक उपस्थित होते.