प्रितम जनबंधु

संपादक 

 

 गडचिरोली येथुन जवळच असलेल्या पोर्ला येथील मायावती पिसाराम येंचिलवार व मेंढा येथील सुरेश रोहिदास लाडे’ यांचा आंतरजातीय विवाह होवून स्वागत समारंभाचा कार्यक्रम तुलतूली प्रकल्प ‘पोर्ला येथे वधू – वरांच्या आई – वडीलांच्या सहमतीने व प्रमुख मान्यवरच्या साक्षीने पार पडला. 

सदर स्वागत समारंभास डॉ. महेश कोपूलवार, प्रा. मुनिश्वर बोरकर, हंसराज उंदिरवाडे, माजी उपनिरिक्षक देविदास भोयर, तंटामुक्ती चे अध्यक्ष भाष्करराव मेश्राम, पोलीस पाटिल हितेंद्र बारसागडे, माजी उपसरपंच बापुजी फरांडे, भैसारे, अशोक खोबरागडे, परशराम बांबोळे, संतोष दशमुखे, दत्तुजी कळमवार, आदिच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

 

आंतरजातीय विवाह सोहळा हि काळाची गरज आहे. जाती – पातीचे बंधन तोडून पोर्ला येथील येंचिलवार व लाडे कुटुबियांनी एक आदर्श घडविला. मान्यवरांनी वधू वरांच्या भविष्यात भावी जीवन सुख व समृध्दीचे, आनंदी आणि आरोग्यदायी जावो अश्या शुभेच्छा दिल्यात तर यैचिलवार’ – लाळे परिवाराचे आभार व्यक्त करून अश्या कुटुंबापासुन समाजाने आदर्श घडवावा असे उपस्थीत मान्यवर मंडळीनी विचार व्यक्त केलेत. स्वागत समारंभात भोजनदान देवुन. सोबतच डॉन्स हंगामा ठेऊन सदर स्वागत समारंभ अधीकच रंजक व उत्साहवर्धक झाला.

 

 स्वागत समारंभास अमृत सुनकिनवार, केशव सामृतवार, रवि सामृतवार, रेखा दत्तुजी कळमवार, विशाखा निलेश पटले, माया पांडू अम्मावार, वच्छला शनिराम येंचिलवार, शुभम दशमुखे, बारसागडे सहीत पोर्ला व मेंढा येथील बहुसंख्य पाहुने मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहुन नवदाम्पत्यास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com