कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी.: शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी यांच्या वतीने आयोजित पारशिवनी तालूका स्तरिय विज्ञान प्रदर्शनी-2024 चे बक्षिस वितरण समारंभ स्थानिक केसरीमल पालीवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सम्पन्न झाले.
१) उच्च प्राथमिक गटातून (वर्ग सहावी ते ८ वी) प्रथम क्रमांक विश्वास पाहुणे वर्ग ७ जि.प. उच्च प्राथ. शाळा निलज..
२) उच्च माध्यमिक गटा तुन (वर्ग ९वी ते १२ वी) प्रथम लावण्य कापसे वर्ग-११ वी हरिहर विद्यालय..
3)प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम शोभा रुखमोडे तथागत विद्यालय करंभाड..
४) माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम शशीकांत वाटकर तथागন विद्यालय करंभाड…
५) प्रयोगशाळा सहाय्यक गटातून प्रथम अशोक राठोड धर्मराज विद्यालय कन्हान यांनी प्राप्त केला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सदस्या सौ. पुष्पाताई पालिवाल उपस्थित होत्या.
गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, शिक्षणविस्तार अधिकारी सुनिल कोडापे, मुख्याद्यापिका हिमांगी पोटभरे, उपमुख्याद्यापिका चित्ता कहाते, केंद्रप्रमुख ममता पाटील, उर्मिला गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होत्या.
विज्ञान विषयक जागृती बालेय स्तरापासून व्हावी व मुलांना विज्ञान विषयाची गोडी व आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते असे विचार प्रास्ताविकेतून गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांनी मांडले.
देशात सर्वत्र तंत्रज्ञान व आधुनिक साधनांची व्याप्ती व गरज पाहता अधिकाधिक संशोधन व नवनविन शोध झाले पाहीजे विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केले जानारे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असुन विज्ञान संशोधन भविष्यासाठी नव्हे तर आम आत्ताच्या काळाची गरज आहे. असे मनोगत अध्यक्ष पुष्पाताई पालीवाल यांनी व्यक्त केले.
उच्च प्राथमिक गटातून (वर्ग सहावी ते ८ वी) प्रथम क्रमांक विश्वास पाहुणे वर्ग ७ जि.प. उच्च प्राथ. शाळा निलज, दितीय कनक थुल वर्ग-७ हरिहर विद्यालय पारशिवनी व तृतीय ओंकार कठाणे वर्ग – ७ लाल बहादूर शास्त्री बाभुळवाडा यांनी प्राप्त केला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटा तुन (वर्ग ९वी ते १२ वी) प्रथम लावण्य कापसे वर्ग-११ वी हरिहर विद्यालय पारशिवनी, व्दितीय अथर्व दिवटे वर्ग-९ लाल बहादूर शास्त्री विद्यालय बाभुळवाडा, तृतीय रश्मी भुजाडे वर्ग-१० केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी यांनी प्राप्त केला, तर प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम शोभा रुखमोडे तथागत विद्यालय करंभाड, माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम शशीकांत वाटकर तथागন विद्यालय करंभाड, प्रयोगशाळा सहाय्यक गटातून प्रथम अशोक राठोड धर्मराज विद्यालय कन्हान यांनी प्राप्त केला. विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्त्र देवून व्यांचा गौ र व करण्यात आला.
प्रदर्शनीचे परिक्षक म्हणून सचिन गेडाम धर्मराज विद्यालय कन्हान, सुबमा खंले हरिहर विद्यालय पारशिवनी, कल्याणी प्रधान लालबहादूर शास्त्री विद्यालय बाभुळवाडा यांनी कार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास ढोबळे यांनी केले तर सुनिल कोडापे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रोशन लेंडे, प्रकाश सोमकुवर, धनराज राऊत, कवडू घोटे, मनोज धोंगडे, पुष्पा परतेकी, विद्या परतेकी, गेमीना सोमकुवर यांनी प्रयत्न केले.