ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :-
दिनांक 10.12.2024 ला परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृती ची तोडफोड करून विटंबना करण्यात आली..
सदर घटनेमुळे संविधान प्रेमी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या.या घटनेचा निषेध नोंदवत भारतीय बोद्ध महासभा तालुका शाखा आरमोरी च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
हा प्रकार निंदाजनक असून ही घटना देशद्रोही स्वरूपाची आहे त्यामुळे आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि देशद्रोही कायद्यानुसार आरोपींना शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी निवेदनातून केली आहे.सोबतच निरपराध बोद्ध आंबेडकर वादयाची कोबिंग अंतर्गत पोलिस कार्यवाही थांबवण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी धर्माजी बाबोळे ,हिरालाल वालदे, ,प्रदीपकुमार रोडगे,जयकुमार मेश्राम , भारती मेश्राम ,अंजलिताई रोडगे,विद्या चौधरी,ताराचंद बंसोड , सिद्धार्थ साखरे ,पुंडलिक इंदुरकर ,यशवंत लोणारे,दिवाकर रामटेके,वासुदेव अंबादे,अंजू सहारे, भावना बरसागडे, वर्षा खोब्रागडे,कल्पना ठवरे, समिना मेश्राम ,किरण बांबोळे , राधाताई हुमने,कविता उंदिरवाडे ,संध्या रामटेके,गयाबाई जंनबंधू,कुसुम मेश्राम, छाया मुल्लेवार ,पल्लवी खोब्रागडे,आदी बौद्ध उपासक आणि उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.