दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था तसेच राष्ट्रनिर्माण संघठण संस्था अंतर्गत पोलिस परिवार व पोलिस मित्र न्याय हक्क संघर्ष समिति, राष्ट्र निर्माण पोलिस सेल, राष्ट्रनिर्माण पोलिस बॉयज एसोसिएशन, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी, कल्याणकारी एसोसिएशन महाराष्ट्र या सर्व संस्थेचे संयुक्तपणे पोलीस बांधवांच्या न्याय हक्कासाठी नागपुर हिवाळी अधिवेशनात शुक्रवार (दि.20) रोजी मोर्चा धडकणार आहे.
सेवा निवृत्त शिखरसंस्थेचे अध्यक्ष संपत जाधव व त्यांचे सर्व जिल्हा अध्यक्ष यांचे तसेच निलेश नागोलकर व भारती तिवारी व अरुण झोटींग यांचे नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंत स्टेडियम, धंतोली, वर्धा रोड, नागपुर येथून मोर्चा आंदोलनाची सुरवात होईल. सेवानिवृत्त आणि कार्यरत पोलिस यांच्या हक्काच्या मागण्या कार्यरत पोलीस बांधवांप्रमाणे सेवानिवृत्त पोलीस बांधवांना आरोग्य योजना, टोल माफ, निवृत्तीवेतन अंश राशीकरणाचे पुनर स्थापना, पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात यावी, सेवानिवृत्त बांधवांनी केलेल्या आठ तासाचा मोबदला, राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केलेल्या पोलीस बांधवाना एस.टि बससेवा, रेल्वे प्रवास महानगर अथवा महापालिकेच्या हदितील बसप्रवास, मेट्रो प्रवास मोफत करणेसाठी एकमताने निर्णय घेणेत यावेत अशा व इतर २१ मागण्या मार्गी लावण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिखर संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव यांनी सांगितले.