शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना जिवे मारण्याची धमकी… — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

           वृत्त संपादिका 

       परभणी प्रकरणातंर्गत पोलिस प्रशासनाच्या गलथान कारभाराचा खरपूस समाचार घेत,”अन्याय व अत्याचारग्रस्तांच्या रक्षणासाठी व संरक्षणासाठी रास्त मागणी रेटून धरणाऱ्या,शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना आज नागपूर विमानतळावर एका इसमाने मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली.

           सुषमा अंधारे आज नागपूर विमानतळावर पोहोचताच ३ वाजून ३६ मिनिटांनी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने खून करण्याची धमकी दिली.

        यासंबंधाने त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवित नागपूर विमानतळावरील सिसिटिव्ही कॅमेरा फुटेज चेक करण्याची मागणी केली व सदर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.

       तद्वतच मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की माझ्या हत्येचे गांभीर्य अतिशय संवेदनशील आहे तर त्यांनी माझ्या सुरक्षा संबंधाने हालचाली कराव्यात असेही मुख्यमंत्र्यांना केलेल्या ट्विट मध्ये नमूद आहे.