कुंभा येथे भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन तथा नवनिर्वाचित आमदार-खासदार यांचा आदरपूर्वक सत्कार समारंभ… — सरपंच अरविंद भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम…

     रोहन आदेवार 

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 

मारेगाव :- तालुक्यातील कुंभा येथील सरपंच अरविंदभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नृत्य स्पर्धा दि. २०, २१, २२ डिसेंबर २०२४ ला जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे.

       दिवसेंदिवस कला क्षेत्राला महत्व प्राप्त होत आहे.आपल्या भागातील युवावर्गाच्या अंगी असलेले अनेक सुप्त गुण लपले असून,त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या नृत्य स्पर्धेचे माध्यम असणार आहे.

         वणी-मारेगांव-झरी तालुक्यातील नृत्य कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तीन दिवसीय भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन अरविंदभाऊ ठाकरे आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ देरकर वणी विधानसभा,श्रीमती प्रतिभाताई सुरेश धानोरकर खासदार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा,संजय देशमुख खासदार यवतमाळ-वाशीम लोकसभा यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

         नृत्य स्पर्धा ही दोन गटात होणार असून गट “अ” (१४ वर्षा खालील) व गट “ब” (१५ वर्षा वरील) या दोन गटात असून या स्पर्धेत हजारो रुपयांचे पारितोषिके ठेवण्यात आलेले आहे.

        कार्यक्रमाचे उदघाटक संजयभाऊ देरकर (आमदार वणी विधानसभा), कार्यक्रमाचे अध्यक्ष एड.देविदासजी काळे (अध्यक्ष-रंगनाथ स्वामी पतसंस्था,वणी) तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणताई देरकर,मनोजजी साकला सामाजिक कार्यकर्ता,गणेशजी केंद्रे साहेब DYSP वणी,संजय सोळंके ठाणेदार मारेगाव,सुनीलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदिरा गांधी सूतगिरणी वणी,विवेकानंद मांडवकर,भीमराव व्हनखंडे BDO मारेगाव,विजय उईके,देवरावजी ठेपाले उपस्थित राहणार आहे.  

     या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी

१) धनराज ठेपाले..

मो. 9545850558…

 २) मारोती मुप्पीडवार

मो.9823382865…

  ३) नागेश रायपुरे…

 मो.8208452339..

४) विवेक बोबडे…

 मो. 8830409323..

५) मुकेश महाडोळे…

   मो.8888614747..

६) मयुर ठाकरे…

   मो.9158622602…

     या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

       या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्वरधारा ग्रुप मारेगाव व अरविंद ठाकरे मित्र परिवार दहेगावचे विशेष सहकार्य लाभणार आहे.