एकजुटीच्या जोरावर महाराष्ट्राचे चित्र बदलणार :- शरद पवार — चर्ऱ्होली येथील बैलगाडा शर्यतीला शरद पवारांची भेट…

 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रमध्ये ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाची चिंता नाही. बळीराजावर संकट ओढवले आहे. बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय राज्य शासनाकडून घेतले जात आहे. तुमच्या सर्वांच्या एकजुटीवर जोरावर महाराष्ट्राचे चित्र लवकरच बदलणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.

          उद्योजक सुधीर मुंगसे व संचालक सोमनाथ मुंगसे यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील चर्होली खुर्द येथे साहेब केसरी या भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शेवटच्या दिवशी मेगा फायनलला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी बैलगाडा घाटात सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

              यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार विलासराव लांडे, विठ्ठल मणियार, हिरामण सातकर, देवेंद्र बुट्टे पाटील, बबनराव कुऱ्हाडे, आयोजक सुधीर मुंगसे व संचालक सोमनाथ मुंगसे, पांडुरंग बनकर, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड यावेळी उपस्थित होते.

             यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की काहीजण मला म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे, लवकरच तुमच्या साक्षीने नवा इतिहास घडविणार, आजपर्यत टिव्हीवर बैलगाडा शर्यती पाहिल्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणं फिटत नाही,” अशा शब्दात पवारांनी शर्यतीचे कौतुक केले. “बैलगाडा शर्यत हि वेगवान स्पर्धा आहे. बैलगाडा शर्यतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळी नावलौकिक मिळेल. असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैलगाडा घाटात शेतकऱ्यांसमोर केला.