माहुली गावालगतच्या शिवारात बिबट्याने पाडला बकरीचा फडसा.

 

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पारशिवनी तालुक्यातील माहुली गावालगतच्या शिवारात गोठ्यात घुसून बिबट्याने एक बकरीचा फडशा पाडल्याची घटना रात्रोला घडली. 

           माहुली गावात राहणारे शामराव मारोती भोयर यांच्याकडे काही बकऱ्या आहेत.या बकऱ्या त्यांचा घरा जवळील गोठ्यात सायकाळीला ते बांधत असतात.

         मात्र,रात्रोला ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने गावातील गोठ्यात येऊन एका बकरीचा फडसा पाडल्यानंतर,बकरी घायाळ अवस्थेत दिसली.हल्ला करणाऱ्या बिबट गावातील लोकाना दिसून आल्याने परिसरातील व गावातील नागरिक दहशतीत आहेत.

               परीसरात विबट्या दिसला व त्याचे पाऊल खुणाही आढळल्या.या घटनेची माहिती त्यांनी लगेच वनपरीक्षेत्राचे वनरक्षक डि.जी.विभुती यांना कळविली. 

         या घटनेची माहीती वनरक्षक डि.जी. विभुती यांनी वनपाल अशोक दिग्रेसे यांना दिली.आज सकाळी घटना स्थळी वनपाल अशोक डिग्रेसे,वनरक्षक डि.जी.विभुती,वनमजुर मैसुर भोडेंकर हे आले व घटनेचा पंचनामा केला.

        या घटनेमुळे शामराव मारोती भोयर यांचे अंदाजे विस हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याचे कळते.या परीसरात बिबट्या नेहमीच वावर असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.अश्या अनेक घटना येथे घडतच राहतात.या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा,तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मोबदला द्यावा अशी मागणी सरपंच व पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांची आहे.

         गावातील सरपंच प्रेम कुसुबे,पोलिस पाटिल ज्ञानेखर बिरो,अश्विन कुसुबे तसेच गावातील पुढारी व नागरिक व शेतकरी यानी पिडीत शेतकरी शामराव भोयर यांना लवकरात लवकर शासनाचे नियमानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी केली.