चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित भेट साहित्यिकाच्या द्वारी या उपक्रमांतर्गत अखिल भारतीय मराठी गझल साहित्य संमेलनाची माजी संमेलनाध्यक्ष गझलकार प्रल्हाद सोनेवाणे यांच्या घरी बी. ए., बी.कॉम, बी. एससी., एम ए मराठी व मराठी भाषा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
समर्थ महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे आणि मराठी विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी गझलकार प्रल्हाद सोनेवाणे यांना आपल्या मनातील साहित्यावरील प्रश्न विचारले. साहित्य लिखाणाला सुरुवात कशी करावी. नवीन तंत्रज्ञानामुळे साहित्य लिखाण कमी होत आहे का? लोक वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहेत काय? अशा अनेक प्रश्नांची विद्यार्थ्यांकडून विचारणा झाली आणि त्यावर सकारात्मक उत्तरे यावेळी विद्यार्थ्यांना गझलकार प्रल्हाद सोनेवाणे यांनी दिली. अतिशय प्रकट मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.
साहित्यिकांना आपल्या महाविद्यालयात बोलावणे हे नेहमीच आपल्याला दिसून येते तर यावेळी साहित्यिकाच्या घरी जाऊन त्यांचे राहणीमान त्यांची लिखाणाची पद्धत व सगळ्या गोष्टींची विद्यार्थ्यांना याप्रसंगी जवळून बघताय आले.
या उपक्रमादरम्यान मराठी विभाग प्रमुख डॉ. बंडू चौधरी, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा तेजराम चांदेवार यांच्या सोबत पूजा काणेकर, श्रेया काडगाये, सेजल वाघाये, निकिता दुमनखेडे, श्रद्धा उईके, सायली ठाकरे, आम्रपाली अंबादे, गर्दीपसिंग गील, सांज गभने, दिव्या मारोडे, सोनाली वंजारी, पायल मेंढे, वैष्णवी ठवकर, मनीष कोईके, शिवम दुर्वे, चेतन भोतमांगे, निशांत वासनिक आदी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा अजिंक्य भांडारकर यांनी प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी यांनी तर आभार प्रा तेजराम चांदेवार यांनी मानले.