धानोरा /भाविक करमनकर

      जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोराच्या विद्यार्थ्यांची नुकतीच एक दिवसीय शैक्षणिक सहल सालेभट्टी येथील नदीवर नेण्यात आली विद्यार्थ्यांची निरिक्षण क्षमता वृद्धिंगत व्हावी व परिसराचे ज्ञान त्यांना परिसरातूनच मिळावे या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पावसाचे पाणी कमी पडत असल्याने लवकरच नद्या कोरड्या पडत असल्याने पाणी अडवणे व ते जिरवणे अत्यंत आवश्यक झाले आहे . ही काळाची गरज ओळखून शालेय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी सालेभट्टी नदीत वनराई बंधारा बांधून “पाणी अडवा – पाणी जिरवा ” या मोहिमेचा प्रत्यय आणून दिला. 

   याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डाकराम कोहाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वनभोजनाची व्यवस्था केली. याप्रसंगी प्रशांत साळवे , रश्मी डोके , हरित सेना प्रमुख शंकर रत्नागिरी , प्रशांत तोटावार , रेखा कोरेवार , विजय बुरमवार , प्रमोद सहारे, ओमप्रकाश देशमुख, रजनी मडावी, स्नेहा हेमके , अशोक कोल्हटकर, मोहन देवकत्ते , हरिश पठाण ,किरण दरडे इत्यादी शिक्षक , शिक्षिका तसेच उमाराणी चेलमेलवार , बादल वरगंटीवार , जैराम कोरेटी, भालचंद्र कोटगले इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com