नीरा नरसिंहपुर दिनांक: 16
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.
तुळशी तालुका माढा येथील पुराण काळापासून प्रसिद्ध देवस्थान व गावचे कुलदैवत आसणारे श्रीकृष्ण मामा नालसाहेब बाबा यांचे पिंपरी बुद्रुक मध्ये आगमन होताच सुतार समाजाच्या वतीने देवाच्या मूर्तीचे स्वागत करण्यात आले. मारुती बाबुराव सुतार, चंद्रकांत बाबुराव , बाळासाहेब बाबुराव सुतार, पोपट बाबुराव सुतार या सर्व सुतार बांधव व भगीनींच्या वतीने देवाच्या मकर मूर्तीचे मनोभावे श्रीफळ फोडून व महापूजा करून सर्वांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्याचा लाभ सुतार बांधवांनी घेतला.
तुळशी येथील देवस्थान यात्रा कमिटीचे व संपूर्ण भागाचे व परिसराचे हे कुलदैवत आसल्यामुळे सगळ्यांचे श्रद्धास्थान व प्रत्येक भाविकाला नवसाला पावणारे देवस्थान आसल्यामुळे, सवारी बसवण्यासाठी देवाची मूर्ती पिंपरी बुद्रुक येथील सुतार कारागीर लक्ष्मण सखाराम सुतार, यांच्या कडून मकर मूर्ती तयार करून घेण्यात आली. व या मूर्तीला संपूर्ण चांदी लावण्यात येणार असून तीच मूर्ती मंदिरामध्ये महापूजेसाठी बसविण्यात आलेली आहे .असे
यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.तुळशी येथील सर्वच भाविक भक्त व यात्रा कमिटी देवाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी पिंपरी बुद्रुक मध्ये हजर होती. मोहन मारुती दगडे, सुनील भागवत होनमाने,नामदेव रामहरी खांडेकर, दिलीप हरी मोरे, बाबुराव त्रिंबक राऊत, भास्कर काशिनाथ वाघमारे, मारुती विठोबा शिंदे, शिवाजी जयराम देवकर, दत्तात्रेय बाळकृष्ण दुधाने, तात्यासाहेब पांडुरंग मोरे, कृष्णा बलभीम घाडगे, या सर्वांच्या उपस्थित पिंपरी बुद्रुक गावच्या वतीने सुतार बांधवांनी देवाच्या मूर्तीचे मोठ्या उत्साहात स्वागत करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. शेवटी भाविकांना महाप्रसाद देऊन पुढील ठिकाणी तुळशी तालुका माढा याकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले.