नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देणार,त्यांच्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करणार,शिक्षणाच्या प्रवाहात चिमूरला आणणार,रोजगार उपलब्ध करून देणार… — झोपडपट्टी धारकांना व जबरानज्योत धारकांना मालकी हक्क पट्टे मिळवून देणार:- डॉ.सतिश वारजूकर.‌

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

        चिमूर नगरपरिषद अंतर्गत नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पिण्याकरीता स्वच्छ पाणी मिळत नाही व वापर करण्यासाठी मुबलक पाणी सुध्दा मिळत नाही.नगरपरिषद झाल्याने शासनाच्या योजनांचा लाभ सुध्दा नागरिकांना मिळत नाही.

       याचबरोबर झोपडपट्टी धारकांना व अतिक्रमण धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यात आले नाही.विद्यार्थांना आवश्यक शिक्षणाची सुविधा नाही,बेरोजगाराच्या हातांना काम नाही,या सर्व समस्यांकडे माझे जातीने लक्ष असून त्या सर्व समस्या मी निकाली काढण्यासाठी यशस्वी होणार आहे.तुमच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीच आपण मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे,असे विनंती पुर्वक आवाहन डॉ.सतीश वारजूकर यांनी सभेला उपस्थित असलेल्या मतदार,बंधू-भगिनींना केले.

         विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने आज चिमूर शहरात काँग्रेस पक्षातर्फे रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत स्थानिक मतदारांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला.

       श्रीहरी बालाजी देवाचे दर्शन घेऊन बाजार चौक ते चावडी चौक असे मार्गक्रमण करीत प्रचार रॅली डोंगरावर चौक येथे पोहोचली.तिथे रॅलीचे रुपांतर सभेत झाले.

        चिमूर येथील रॅलीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल संघठक धनराज मुंगले,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा महासचिव गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,शहर अध्यक्ष अविनाश अगडे आणि महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

                 उमेदवार डॉ.सतीश वारजूकर यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या असंवेदनशील कार्याचे वाभाडे काढीत मतदारांना त्यांचे असयोगी व भ्रष्ट कार्य समजावून सांगितले व असा आमदार मतदारांचे हित जपरणारा नाही हे मतदारांच्या लक्षात आणून दिले.

                                आमदार किर्तीकुमार भांगडीया व भाजप समर्थित महायुतीच्या लोक विरोधी कार्यपद्धतीवर घणाघात वार करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मते देऊन सहकार्य करावे असे आवाहनही डॉ.सतीश वारजूकरांनी केले.

     तद्वतच बालाजी सागर,क्रिडांगणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर आहे असे सुध्दा त्यांनी उपस्थित आश्वासन दिले.