भिसीला तालुका दर्जा देण्यासाठी यशस्वी होणार:- डॉ.सतीश वारजूकर 

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी भिसीला अप्पर तालुका करुन ठेवले,त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी बसत नाही.

     यामुळे तिकडील भागातील नागरिकांचे,विद्यार्थ्यांचे,महिला भगिनींचे आवश्यक कार्यालयीन कामे अप्पर तहसीलदार कार्यालयातून होत नाहीत.

       मी आमदार झाल्यास भिसी अप्पर तहसीलदार कार्यालयाला,तहसीलचा दर्जा देण्यासाठी यशस्वी होणार असे प्रतिपादन डॉ.सतीश वारजूकर यांनी काल झालेल्या प्रचार सभेत केले.