युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार येथिल मुख्य बाजार चौकात युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रमेश बुंदीले यांची प्रचार सभा शनिवार (दि.16) आयोजित करण्यात आली होती.
या सभेला माजी खासदार नवनित राणा यांनी संबोधित केले. दरम्यान भाषण संपल्यानंतर नवनित राणा या त्यांच्या वाहनाकडे जात असतांना किरकोळ करणावरुन वाद झाला.
याच वादातुन काही नागरिकांनी राडा करीत घोषणाबाजी व अश्लिल इशारे करीत नवनित राणा व पदाधिकारी आदींना खुर्च्या भिरकावल्यात. एकाने नवनित राणा यांच्या अंगावर गुटखा व खर्रा खाऊन थुंकन्याच्या प्रयत्न केला तो थुंका त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर गेला.
या घटनेमुळे रात्री 10:30 नंतर सभास्थळावरील वातावरण चांगलेच चिघडले व दोन्ही गटाकडून एकमेकांनावर खुर्च्या फेकन्यात आल्या होत्या.
सदर घटनेत राजु श्रीकृष्ण मोपारी (वय.56) रा.लांडी, अजय सुरेश देशमुख (वय.44) रा.चिंचोली बु, भुषण श्रीकृष्ण बोरखडे (वय.34) रा.रामगाव हे तिघेजण जखमी झाले आहेत.
रात्री ऊशीरा नवनित राणा, पदाधिकारी व समर्थकांनी खल्लार पोलीस स्टेशनवर धडक देऊन ठिय्या मांडून हल्ला करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करुन अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत हल्ले करणाऱ्याना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका भाजप, युवास्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.
त्यामुळे खल्लार ठाण्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता.अखेर ठाणेदार राहुल जंजाळ यांनी परिस्थिती हाताळली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधीकारी शिवम इसापुर, किरण वानखडे यांनी रात्रीच भेट देऊन गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त कुमक बोलाविली होती.
मध्यरात्री नवनित राणा यांच्या तक्रारीवरुन खल्लार पोलीसांनी वुत्त लिहीस्तोवर सोफियान पठाण, सैय्यद गब्बर दोघेही रा.बेंबळा बु. व कलीम शहा व अन्य दोन जण रा.खल्लार असे एकुण पाच जणांना ताब्यात घेऊन अटक प्रक्रीया सुरु होती.
तसेच अज्ञात 50 जणांविरुध्द कलम 189(2),191(2),191(3),190,118(1),115(1),109,132,296, सहकलम 3(1) (आर ) 3(1)(एस ) एक्ट्रासिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड करीत आहेत.
बॉक्स
खल्लार येथिल मुख्य बाजार चौकात नेहमीच सभा व इतर सार्वजनिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात. कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा खल्लारच्या इतिहासात पहिल्यांदा घडला असल्याने घडलेल्या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.