आळंदीत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विज्ञान प्रदर्शन संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत ज्ञानेश्‍वर विद्यालयात पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित शंभरहून अधिक प्रकल्प मांडले. ज्ञानेश्‍वर विद्यालयात झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांच्या हस्ते झाले.

          याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले, नारायण पिंगळे, संजय कंठाळे, कल्पना घोलप, आरती वडगणे, अनुराधा खेसे, योगेश मठपती, पूजा चौधरी, पूजा कलशेट्टी, विज्ञान प्रयोगशाळा प्रमुख बाळासाहेब भोसले, अरविंद शिंदे उपस्थित होते.

          दळणवळण, ऊर्जा समस्या, शेती, जलशुद्धीकरण या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रकल्प केले होते. शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचेही आयोजन केले होते.

           विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वारस्य वाढवणे, कल्पनाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनात बहुसंख्येने सहभागी करून घेत असल्याचे ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले. 

        मुख्याध्यापक प्रदीप काळे, दीपक मुंगसे उपस्थित होते. प्रास्ताविक मनीषा पवार यांनी केले. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी तर आभार संजय उदमले यांनी मानले.