
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
कामगार म्हटले की श्रम करणारे नागरिक.तद्वतच श्रमाचे प्रकार वेगवेगळे असतात.मात्र श्रमातंर्गत दर्जा निर्माण करणारे आणि ओळख दाखविणारे श्रम भारत देशात प्राचीन काळापासून अद्यापही परंपरेनुसार सुरु आहेत व राहणार आहेत.
यातच साफसफाई करणारे कामगार म्हटले की त्यांच्या श्रमाची विशेष ओळख जगप्रसिद्ध आहे.
सुर्योदय होण्यापूर्वीच सफाई कामगार स्वच्छतेच्या कामाला लागतात व विशेष परिश्रम घेत आपले शहर स्वच्छ करतात,सुंदर बनवितात.
स्वच्छतेशिवाय मन प्रसन्न राहत नाही आणि आपण खुल्या मनाने कामही करु शकत नाही हे वास्तव दैनंदिन चर्येशी जुळलेले आहे.
मात्र,सफाई कामगार अश्वच्छ शहराला स्वच्छ करतात तेव्हा त्यांचा दररोजचा सामना विविध प्रकारच्या विष्ठेंसी,घाणिसी,दुर्गंधीसी व धुळासी होतोय.
तरीही सर्व प्रकारच्या घानीला व दुर्गंधीला दररोज सामोरे जात अशाही परिस्थितीत शहराला स्वच्छ व सुंदर बनवितात तेव्हा त्यांचे वास्तविक आयुष्य किती मोठे आहे याची कल्पना न केलेलीच बरी…
सर्व प्रकारच्या दुर्गंधीना झेलत शहरांचा प्रत्येक भाग स्वच्छ व सुंदर करतांना त्यांचे होत असलेले एकाग्र मन हेच सांगून जातय,”की,माझ्या शहरातील नागरिक हे निरोगी व आनंदी राहिले पाहिजेत.
नागरिकांना निरोगी व आनंदी ठेवण्यासाठी निष्ठेंनी कर्तव्य पार पाडणाऱ्या सफाई कामगारांचे कौतुक करण्यासाठी विवेकता समोर येताना दिसत नाही तेव्हा मन शून्य होतय.
तद्वतच दररोज साफसफाई करताना सफाई कामगार स्वतः अश्वच्छ होतात,याबात त्यांना काय वाटत असेल याचा विचार न केलेलाच बरा!
सफाई कामगार हे स्वच्छता अंतर्गत विविध प्रकारच्या दुर्गंधीने व धुळाने दररोज अश्वच्छ होतात तेव्हाच शहरातील सर्व नागरिकांना प्रशन्न चित्ताने काम करण्याची नामी संधी दररोज देत राहतात हे विसरून चालणार नाही.
सफाई कामगारांचा पगार किती आहे हे महत्त्वाचे नसून ते प्रत्येक घाण साफ करतात हे महत्त्वाचे आहे.
कारण दैनंदिन चर्येशी निगडित असल्याने त्यांचे स्वच्छतेचे कर्तव्य हे सर्व नागरिकांसी अगदी जवळून संबंधित आहे.