वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

 

वाशिम :- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१७/११/२०२२ रोजी इंदानी महाविद्यालय कारंजा येथे कॉलेजच्या युवकांसोबत मूल्यांबाबत कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेमध्ये *1) सामाजिक न्याय २) प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व ३)पर्यावरणीय न्याय ४) धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ५) स्त्री पुरुष समानता 6)श्रम प्रतिष्ठा* या मूल्याबाबत युवकांसोबत कार्यशाळा घेण्यात आली आणि तसेच विद्यार्थिनी महाविद्यालय येथे कॉलेज अनुभव कट्टा सुरू करण्यात आला. एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलून निघावे यासाठी अनुभव शिक्षा केंद्र व युवा संस्था महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे.अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे व मा.राजू केंद्रे (एकलव्य फाउंडेशन) मा.प्रकाश शेंडे मा.अतुल राऊत (अनुभव साथी) या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.अशा महत्वाच्या मुल्यांचा विचार करणे गरजेचे आहे.आणि तोच विचार प्रत्येक तरुणाच्या मनात जागृत व्हावा यासाठी अनुभव शिक्षा केंद्र काम करत आहे. आणि त्याचा परीनाम म्हणून ग्रामीण भागातील तरुण जागरूक होऊन आपल्या न्याय हक्कासाठी आज लढताना दिसत आहे.हे सगळ पाहून मनस्वी खूप आनंद होत आहे.व अशा अनेक विषयावर विद्यार्थ्याशी संवाद साधत विध्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी सुभेचा दिल्या. अशाप्रकारे ही कार्यशाळा संपन्न झाली.

 

 

आशिष धोंगडे

 वाशिम प्रतिनिधी

 दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com