डॉ. जगदिश वेन्नम/संपादक
रेगुंठा:-जंगलाचा जिल्हा व आदिवासी अति डोंगराड नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हातील शेवटचे टोकावर महाराष्ट्र राज्य, तेलंगाणा, छतीसगढ असे तीन राज्याचे सीमा असणारा सिरोंचा तालुक्यातील अति घनदाट जंगल, डोंगर दऱ्या, नदी, नाले असणारा भाग, नक्षलप्रभावीत रेगुंठा येथील प्रवासी वाहन चालक युवती किरण रमेश कुर्मा हिने सिरोंचा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून तेलंगाणा येथील करीमनगर च्या उस्मानिया युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्र विषयात पदवीधर शिक्षण पूर्ण केले .
आपल्या वडिलांचे व्यवसाय प्रवासी वाहन चालक कामात अधून मधून मदत करत असे अश्यातच तिच्या वडिलांचं अपघात झाला व एक पाय अपंग झाल्याने कुटूंबाचे उदरिर्वाहासाठी अडचण जात होते ही बाब लक्षात घेऊन महिला अबला नाही सबला आहे या म्हणी सारखं स्वतः किरण ने कुटूंबाकरिता प्रवासी वाहन चालक बनली आणि रेगुंठा ते सिरोंचा या 70 किमी च्या खडतर मार्गावर प्रवाशी घेऊन दररोज ये जा करीत आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात लेडी ड्रायव्हर म्हणून किरण ने नवलोकिक मिळविली या कार्याची दखल घेत केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, सामाजिक संघटने असे विवीध संस्थे महिला चालक किरण ला विविध अवॉर्ड, सन्मान, प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहेत.
यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, नोबेल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड, क्रेजी टाल्स अवार्ड, राज्यस्तरीय कर्तव्यवान नारी पुरस्कार, जीवन सन्मान पुरस्कार, आत्मनिर्भय भारत सन्मान पुरस्कार, भारतीय शौर्य सन्मान पुरस्कार, फोरएवर स्टार इंडिया अवॉर्ड, लीड इंडिया सर्टिफिकेट, लोकल बिझिनेस अवॉर्ड अश्या विविध पुरस्काराने सन्मानित झालेल्या लेडी ड्रायव्हर किरण रमेश कुर्मा हिला वर्ल्ड हुमन राईट्स प्रोटेक्शन कमिशन संस्थेच्या वतीने होनोररी डॉक्टरेट अवॉर्ड ने सन्मानित होणार आहे.
वाहन चालक किरण रमेश कुर्मा गेल्या कोरोना काळात अनेक मदत कार्य केले आहेत परराज्यात अडकलेल्या प्रवाश्यांना घरा पर्यंत सोडणे, जीवनावश्क वस्तू पुरवठा करणे, दवाखाण्याने आण करणे असे विविध सेवा कार्य ही केले आहेत.