भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक १७-१०-२०२४ रोज गुरुवारला जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे काला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे स्पर्श संस्था गडचिरोली व जिल्हा महिला बाल विकास कार्यालय गडचिरोली, यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौहान हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा टिकाराम धाकडे प्रियंका आसुटकर बाल संरक्षण अधिकारी जिल्हा महिला बाल विकास गडचिरोली रुपाली काळे जिल्हा संरक्षण अधिकारी गडचिरोली व्ही आर बुले संरक्षण अधिकारी धानोरा नयुष सहारे सामाजिक कार्यकर्ता स्पर्श संस्था गडचिरोली हे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी बाल विवाह याविषयी विचार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यांनी बाल विवाह, बाल लैंगिक अत्याच्यार, बाल कामगार व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे सरक्षण कायदा २००५-२००६ याविषयी सविस्तर अशी माहिती देऊन विध्यार्थ्यांन मध्ये जाणीव जागृती करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्रा.कैलास खोब्रागडे, प्रा.निवेदिता वटक, प्रा.भाविकदास करमनकर, प्रा. विराग रणदिवे,प्रा.वसंत आवारी व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नयुष सहारे यांनी केले.