
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
रेती व मुरुम या खनिज संपदेवर सर्व सामान्य नागरिकांचा शतप्रतिशत हक्क असतोय आणि खनिज संपदा लिज मिळकती अंतर्गत नागरिकांचा विकास केला जातोय.
मात्र,चिमूर तालुक्यात सत्तेचा माजच माज चढला असून या माजातंर्गत रेती व वाळूचे अवैध उत्खनन करणाऱ्यां चोरांना पुर्णतः सुट दिली जात असल्याचे वास्तव आहे.
मागील १० वर्षाच्या कालखंडात रेती व मुरुमांचे खरबो रुपयांचे अवैध उत्खनन झाले असून सदर अवैध उत्खननाकडे आमदारासह स्थानिक प्रशासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे.
मागील १० वार्षात झालेल्या खरबो रुपयांच्या अवैध उत्खननाचा रुपया कुणाकुणाच्या घशात गेलाय,हे कोडे सत्तेच्या माजात का म्हणून बाहेर पडले जात नाही? किंवा उघडपणे अवैध उत्खनन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसह चोरीचे गुन्हे दाखल का म्हणून केल्या जात नाही?हा सहज मुद्दा आहे.
तद्वतच नेरी,खडसंगी,चिमूर,भिसी,शंकरपूर मोटेगाव,जांभुळघाट,मासळ परीसरातून मागिल १० वर्षात दिवसासह रात्रोच्या वेळी झालेले अवैध उत्खनन सत्ता पक्षाच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही,या वास्तव्याला सत्य समजले तर आमदार किर्तीकुमार भांगडियांचा दबाव प्रशासनावर होता काय? याबाबत नागभिड व चिमूर तालुक्यातील नागरिकांत खमंग चर्चा आहे.
मात्र अवैध रेती व मुरुम उत्खननाबाबत नागरिकांत खमंग चर्चा असली तरी चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत स्थानिक पातळीवरील प्रशासन गाढ झोपेत कसे काय आहे?याचे उत्तर चंद्रपूर जिल्हाधिकारी देणार काय?की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार?
आता तर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर अवैध रेती साठा असून या साठ्याकडे तलाठी,मंडळ अधिकारी यांचे लक्ष केव्हा जाणार?
सत्ताधाऱ्यांच्या माजात मस्ती करणारे,”आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना निवडून आणण्यासाठी मारण्याच्या धमक्या देऊ लागले आहेत व भर रस्त्यात स्थानिक पत्रकारांच्या कॅलर पकडू लागले आहेत.हा केवढा मोठा सत्तेचा माज म्हणावा!
चिमूरचे स्थानिक आमदार पराभूत होणार असल्याची कुणकुण सुरू असल्याने,” त्यांच्या खास कार्यकर्त्यांना,आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दबावात न येणाऱ्या स्थानिक पत्रकारांना धमक्या द्यायला सांगितले आहे काय? आणि मारण्यास सांगितले आहे काय?याचे खुलासे पुढे येणे गरजेचे आहे.
तसे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी सांगितले नसेल तर आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी वेळीच आवरले पाहिजे.अन्यथा अनर्थच अनर्थ..