वांझोटे सरकार परवडणारे नाही……!

             एकमेकांच्या कुबड्या घेऊन चालणारे वांझोटे सरकार येणाऱ्या निवडणुकीत निवडून आले तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक,तंत्रज्ञानाच्या प्रगतीला शेवटचा गुलालच फासावा लागेल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा खेळ होऊन सर्व व्यवस्थेला भले मोठे भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही.

        वैयक्तिक नीतिमत्ता तर पूर्ण रसातळाला गेलेली आहे.निष्टा शब्दाने स्वतः ची बदनामी सहन न झाल्याने केव्हाच आत्महत्या केली आहे.उत्तम प्रशासक हा शब्दच स्वप्नांमध्ये ही दिसेनासा झाला आहे.

     ज्या राज्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून न देता त्यांची मने गाभण न राहणाऱ्या विषयाकडे वळवून जाती जाती , धर्माधर्मात भांडणे लावण्याचे उद्योग चालू झालेत. हे महाराष्ट्रातील राजकीय धुरंधरांना कितपत शोभते…? 

लोकांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या उद्योजकांना संरक्षण देऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या हाताला रोजगार हवाय….? 

नाही तर एक दिवस काट्या,शस्त्रे युवकांच्या हातात आली तर ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी योग्य नाही…! व्यापाराचा फायदा हा सर्वसामान्य लोकांबरोबर शासनाला ही होतो…

        शांतता,संयम,चांगले प्रशासन,व्यापार व उद्योगाला चालना वांझोट्या आघाड्या व युत्या कधीच देऊ शकणार नाहीत.कारण हेच भरकटलेले असतात. लोकांना विचार कधी यांच्या डोक्यात येणार…

पाच वर्षे सरकार कसे टिकवायचे हेच यांच्या डोक्यात असते… 

कोण कधी कशासाठी धोका देऊन जाईल हे सांगता येत नाही.म्हणून युत्या व आघाडीचे सरकारे नेहमी वांझोटे राहणार यात सर्व सामान्य लोक भरडले जाणार…. 

यामुळे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडून….

एकच सक्षम सरकार निवडून देणे गरजेचे आहे… नाही तर महाराष्ट्राची प्रतिष्ठा कधीच भरून येणार नाही.

     फसवे,उथळ व सत्तेसाठी हपापलेले विवेकशून्य लोक सत्तेत आले तर माझ्या महाराष्ट्राची सर्कस बघायला त्यात आत्मघातकी भांडणे, दररोज दंगे व कट कारस्थानांना ऊत येईल. पोकळ व दिखाऊ डोलारा कधीच टिकत नसतो…हे महाराष्ट्राला माहीत आहे… परंतू डोळे झाकून युत्या व आघाडीचे सरकार आले तर सामाजिक व आर्थिक डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही.

      एकतेच्या सूत्रात बांधलेल्या लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे.

नाही तर सुडाने पेटलेले लोक महाराष्ट्राला पेटवायला ही कमी करणार नाहीत.कारण हे सर्वच वांझोटे आहेत.त्यांना दया,माया व प्रेम काय कळणार…? 

त्यांना दिवस-रात्र फक्त खुर्ची दिवस असेल तर निष्ठा व सद्गुणांचा यांना काय अर्थ समजणार..? 

     *महाराष्ट्राला सध्या समर्थ व दूरदृष्टीच्या नेत्याची गरज आहे*.त्यामुळे एकच नेता आपल्या स्वतःच्या किंमतीवर व हिमतीवर एकाच विचाराचे सरकार का आणू शकत नाहीत.ते पण खरंच….! 

वांझोट्या लोकांकडून काय अपेक्षा करणार… *जिकडे पाहावे तिकडे दुर्बल मनाचे राजकीय पुढारी उदयाला येऊ लागले आहेत*.हीच पुरोगामी महाराष्ट्राला धोक्याची घंटा आहे. भ्रष्ट व नालायक स्तुतिपाठकाच्या प्रभावाखाली लोक असतील तर भ्रष्ट व लाचखोरी मंडळीच आपल्या नशिबी येणार… 

त्यांच्या पुढे गुडघे टेकू तर… महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत वांझोटाच राहणार की नाही…? 

       राजकीय स्पर्धा,भांडणे व कट कारस्थाने यामुळे प्रशासनाची घडी विस्कटून महाराष्ट्रात गोंधळ व कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊन…

लोक कायद्याला ही जुमेनासे होतील…? 

तेव्हा महाराष्ट्र कसा पाहायला मिळेल…? 

मिलिंद वानखडे

(रिटा,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई)

9881948257