संविधानातील अतीमहत्वाच्या मूलभूत हक्कातील मताच्या अधिकाराचे संरक्षण आणि EVM + VVPAT ला जनतेचा विरोध असतानाही असुरी व्यवस्थेने देशात लादलेल्या निवडणुकीतून मताधिकाराचे संरक्षण करण्यासाठी लोकशाहीवादी आक्रमक आणि संविधानिक उपाय….  — सर्वसामान्य भारतीय नागरिकांना विनम्र आवाहन / आव्हान… 

         मागील दोन्ही लेखात मताच्या अधिकाराचे महत्व संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी किती महत्वाचे आहे, हे आपण बघितले. त्याचबरोबर येथील संपूर्ण व्यवस्थेने ( कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता ) या EVM वरच निवडणुका घेण्याचा अट्टाहास कसे करत आहे, याचेही तपशीलाने समीक्षण केले. जगाने लाथाडलेल्या EVM ला आमच्या व्यवस्थेने स्वीकारले.

         या EVM वर धांदली केलेले अनेक पुरावे देऊन सुद्धा मुख्य निवडणूक आयोग त्या पुराव्याना केराची टोपली दाखवून जनतेला RSS चे गुलाम बनविण्याचे षडयंत्र करत आहे.

          अशाही कठीण परिस्थितीत किंवा यापेक्षाही कठीण परिस्थिती जरी आली…….

       तरी जगाच्या आणि देशाच्या महापुरुष आणि तत्ववेत्त्यानी आपल्याला एक संदेश दिलेला आहे की……

       कितीही वयक्तिक आणि सार्वजनिक मोठे आले तरी आपला त्यावर उपाय करण्याचा व तो अमलात आणण्याचा आत्मविश्वास कधीही नष्ट होऊ देऊ नका. 

     आता वरील आत्मविश्वास द्विगुणित करण्याची ती वेळ येऊन ठेपलेली आहे…… 

     येत्या 13 / 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुका, देशातील इतर राज्यातील 48 विधानसभा निवडणूका, त्याचबरोबर नांदेड आणि वायनाड येथील लोकसभेच्या होणाऱ्या पोटनिवडणूका, यातील सर्व मतदारांनी हा “आत्मविश्वास” कोणता आहे हे समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करूया……… 

      या आत्मविश्वासातून दोन पर्याय हवे तर उपाय म्हणू शकतो आपण त्याला. ते या ठिकाणी मी मांडत आहे…….

    (1) ग्रामीण भागातील (आणि शक्य असेल तर शहरी भागातील) गावातील संपूर्ण गावाने संघठीत होऊन, प्रसंगी ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर करुन निवडणूक आयोगाला म्हणजेच जिल्हाधिकारी यांना पत्राने कळवावे की, ” जर बॅलेट पेपरवर मतदान घेत असाल, तरच आमच्या गावात या. अन्यथा आमचा EVM +VVPAT ला विरोध असेल. आम्ही निवडणुकीवर 100% बहिष्कार टाकू…..!

      आता EVM +VVPAT वर निवडणुका घेऊन सुद्धा आपल्या मताच्या अधीकाराचे संरक्षण करण्याचा दुसरा पर्याय पुढीलप्रमाणे असेल. परंतू , यासाठी निःस्वार्थ, त्याग, समर्पनाची भूमिका असली पाहिजे. केवळ देशहीत डोळ्यासमोर ठेऊन….. 

 (2) आपण (प्रत्येक मतदार ) प्रत्येकाने अपापल्या मतदारसंघात कमीत कमी 11 जणांची किंवा जास्तीत जास्त कितीही लोकांची तात्पुरती निवडणुकीपूरती “समिती “गठीत करावी. मग ती केवळ पुरुषांची असेल, स्त्रियांची असेल, स्त्रीपुरुषांची असेल, किंवा द्वितीय आणि तृतीय पंथीयांची असेल किंवा सर्वांची मिळून असेल.

     त्या समितीने आपापल्या मतदारसंघात जेवढे उमेदवार विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबर पासून अपक्षासहित फायनल होतील. त्या प्रत्येक सर्व उमेदवाराकडे जावे. सोबत व्हिडीओ शूटिंगची व्यवस्था ठेवावी. त्या समितीने प्रथम त्याची मुलाखत घ्यावी. त्यानंतर आपापल्या मतदारसंघातील सार्वजनिक समस्या, राज्याच्या हिताचे प्रश्न, कोणत्याही इतर पक्षात निदान 5 वर्षे जाणार नाही, त्याने ( उमेदवाराने ) आश्वासित केलेल्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी, अशा 10 प्रश्न किंवा समस्यांची नोंद एका 500/- रुपयाच्या बॉण्डपेरवर करावी. तसे शपथपत्र त्या सर्व उमेवाराकडून लिहून घ्यावे.

          आणि जेंव्हा तो उमेदवार निवडून येईल तेंव्हा, या समितीने कोणत्याही बुद्धविहार, मंदिर, मजीद, गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये न जाता सार्वजनिक ओपन स्पेसमध्ये एक जाहीर……….

    नागरी सत्कार आयोजित करावा….. 

     त्यामध्ये जमलेल्या जनतेसमोर या शपथपत्राचे जिंकलेल्या उमेदवाराकडून वाचन करून घ्यावे. त्याची प्रत सर्वाना वाटप करावी. त्यानंतर दर वर्षाला त्याच दिवशी त्या आमदार किंवा खासदाराने केलेल्या वचनपुरतीच्या कामाचा आढावा घेऊन त्याचे कौतुक करुन, पुन्हा एकदा जाहीर सत्कार करावा. जर काम केले नसतील तर त्याला जाबही विचारावा.

 असे 4 वर्षात 4 सत्कार झाल्यानंतर मग आपण पुढच्या निवडणुकीत सुद्धा तीच तयारी करुन लोकशाही आणि संविधान बळकट करण्यासाठी आपले निःस्वार्थपणे, जाती – धर्माच्या पलीकडे जाऊन, राजकारनाच्या पलीकडे जाऊन, वयक्तिक आणि सामूहिक आमिषाला बळी न पडता, एवढे महानकार्य देशासाठी, लोकशाहीसाठी, संविधानाच्या अविष्कारितेसाठी, म्हणजेच आपल्या मुलांसाठी, नातवासाठी, एवढा एकच त्याग जर आपण याच निवडणुकीत प्रयोग केला, तर निश्चितच पुढील पिढीच्या विकासाची पायाभरणी होईल……. 

       जेंव्हा 4 नोव्हेंबर नंतर वरील 2 क्रमांकाच्या उपायाची अंमलबजावणी करू, तेंव्हा याचा संपूर्ण व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल करावा….. 

    असा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात जर यशस्वी झालाच, तर निश्चितच पुरोगामी महाराष्ट्र देशाच्या संविधान आणि लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठीचे 75 वर्षातील पहिले पाऊल असेल……

    हा प्रयोग मी करणार…….

त्याचा व्हिडीओ व्हायरल करणार…….

      आपण………..?

आपणही केलाच पाहिजे…. 

 वेळ खूप कमी आहे त्यापद्धतीने नियोजन ताबडतोब करुया 

या आजच्या पोस्ट बरोबरच मागील दोन्ही पोस्ट समजून घेणे आवश्यक आहे….

          आवाहनकर्ता 

           अनंत केरबाजी भवरे 

 संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689