कोजागिरी पौर्णिमाच्या उत्साहाने नवरात्र उत्साहाची सांगता….  — शेकडो आराध्य मंडळ व भाविक भक्तांनी घेतला कोजागिरी पौर्णिमेचा महाप्रसाद… 

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ग्रामस्थ व शिवशक्ती तरुण मंडळ आणि सर्व भाविक भक्त यांच्या सौजन्याने कोजागिरी पौर्णिमा व नवरात्र उत्सवाची शेवटी महाप्रसादाने सांगता झाली.  

          नऊ दिवस तुळजाभवानी मंदिरामध्ये दररोज सकाळी व संध्याकाळी भवानी माता देवीची मनोभावाने महापूजा व आरती होते आसते त्यामध्ये पहिल्या दिवसापासून ते शेवटी कोजागिरी पौर्णिमा पर्यंत भाविकांच्या हस्ते नामाचा जयघोष करून महापूजा व आरती घेण्यात आली.

          तसेच गावातील भाविक भक्त, समाधान बोडके, नामदेव बोडके, शरद बोडके,अर्जुन मगर, महादेव सूर्यवंशी, बबन बोडके, दत्तात्रय कांबळे, प्रवीण बोडके, लालासो बोडके, तुकाराम बोडके, आबासाहेब तुळशीराम बोडके, हरिभाऊ सुतार, केशव शिवाजी बोडके, या सर्व भाविकांच्या हस्ते संध्याकाळ व सकाळ देवीचा महा अभिषेक दही आणि दुधानी करण्यात आला.

       शेवटी पैलवान सुनील आण्णा बोडके यांच्या निवासस्थानी देवी वाजत गाजत नेहून विराजमान होऊन नवरात्र उत्साह व कोजागिरी पौर्णिमेची सांगता झाली.

        पहिल्यापासून ते शेवटपर्यंत शिवशक्ती तरुण मंडळ पिंपरी बुद्रुक व समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भवानी मातेचा उपक्रम हा नियमाप्रमाणे साजरा होतो आसतो. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प महेश सुतार व बाळासाहेब घाडगे करीत होते.