माताराणी शारदा उत्सव मंडळ सावलीच्यावतीने शहरातील कर्तृत्वान व्यक्तींचा स्वागत सत्कार… — विविध स्पर्धा,बक्षीस वितरण व भोजन दानाचे आयोजन…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

सावली :- माताराणी शारदा उत्सव मंडळ सावलीच्या वतीने शहरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,स्वच्छता कर्मचारी, महिला पोलीस यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

          नवरात्र क्वीन स्पर्धा,संगीत खुर्ची,घागर रेसिंग,बलून गेम ही स्पर्धा घेण्यात आली तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सावली शहरातील प्रसिद्ध स्वच्छतादूत, पर्यावरण संवर्धन व विकास समिती सावली तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा शाल श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

         सावली शहरातील नागरिकांना भोजनदान करण्यात आले.यावेळी माताराणी शारदा उत्सव मंडळ सावलीचे सर्व सभासद ,सन्मानीय नागरिक आधी उपस्थित होते.