चुऱ्हाड फाट्यानजीक रानडुकराची दुचाकीला धडक…. — तरुणाचा गेला जीव, देशमुख कुटुंबावर दुःखाचे सावट…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

             भंडारा : मित्रासोबत कोंढा येथून काम आटोपून राहते गाव पहेला येथे जात असताना डॉ. अरुण मोटघरे कॉलेज जवळ रानडुक्कर रस्त्यावर आडवा येऊन मोटरसायकलला जबर धडक दिली. यामुळे मनोज तुकाराम देशमुख वय २३ वर्ष हा युवक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान भंडारा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. असल्याने देशमुख कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असुन घरातील कर्तबगार युवक गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

          प्राप्त माहितीनुसार मनोज देशमुख हा मित्र स्वप्नील मलोडे यांचेसोबत १२ सप्टेंबरच्या रात्री दुचाकीने (एमएच ३६ एई ०७५३) पवनी तालुक्यातील कोंढा येथून काम आटोपून रात्री ८.३० वाजता पहेला येथे जाण्यास निघाले. दरम्यान मार्गातील डॉ. अरुण मोटघरे कॉलेज ते चुऱ्हाड फाट्यादरम्यान रानडुक्कर आडवा आला. यामुळे दोघेही मित्र रोडवर पडले. यात मनोजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला भंडारा येथील खासगी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान १३ सप्टेंबरला दवाखान्यात निधन झाले. या प्रकरणी अड्याळ पोलिस स्टेशन कलम १७४ अन्वये गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात फौजदार सुभाष मस्के करीत आहे.

              अड्याळ ते कोंढा या राष्ट्रीय मार्ग क्र.२४७ वर काही भागात जंगल आहे. तसेच दुतर्फा धानाची शेती आहे. यामुळे राकनडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या मार्गवर नेहमीच रानडुक्कर आडवे येऊन अनेक अपघात झाले आहेत. तरी वन विभागाने याकडे लक्ष देऊन अकस्मात होणारी हाणी टाळली जावी अशी परीसरातील नागरिकांकडुन मागणी होत आहे.