धानोरा /भाविक करमनकर
धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 असून सुरजागड लोह प्रकल्प सुरू झाल्याने लोह खनिज राजनांदगाव छत्तीसगड येथे त्याची वाहतूक होते ही वाहतूक गडचिरोली ते धानोरा या राष्ट्रीय महामार्गाने होत आहे यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने राष्ट्रीय महामार्ग धानोरा या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच धानोरा तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर धानोरा गडचिरोली मार्गावर लेखा या गावाजवळ अक्षरशः रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळन झाली होती म्हणून लेखा या गावाजवळील खड्ड्यात गिट्टी टाकून तात्पुरता बुजविण्यात आला व वाहतूक सुरळीत झाली पण सुरजागड वरून लोहखनिज घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 34 बी जी 77 01 या क्रमांकाचा ट्रक दिनांक 16 ऑक्टोबर च्या मध्यरात्री सुरजागड वरून छत्तीसगड कडे जात असताना लेखा या गावाजवळ टाकलेल्या गिट्टीच्या ठिकाणी अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून तो ट्रक एमआयडीसी चा फलक असलेल्या बाजूच्या शेतात घुसला ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही तसेच हा ट्रक दोन दिवसापासून तिथेच फसलेला आहे व हा ट्रक चंद्रपूर येथील ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे समजते सुरजागड प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे विशेष