सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली
काही दिवसांपूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रकनी शांतिग्राम जवळ झालेल्या अपघातात मूलचेरा तालुक्यातील कांचनपूर येतील अंजली सुभाष जयधर या बंगाली समाजाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,ह्या नंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या तब्बल १० ट्रकांची जाडपोळ केली होती,काल गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्वतः कांचनपूर येतील जयधर कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी ह्या दुःखद प्रसंगी राजेंनी कुटूंबियांना धीर देत त्यांना आर्थिक मदत केली..!!
भेटी प्रसंगी राजें समोर मृतकाचे पती सुभाष जयधर यांनी आपल्या भावनेची वाट मोकळी करीत,सुरजागड कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले,इतकी मोठी घटना घडल्यावरही ट्रक वाहतूक थांबविली नाही,मृतदेह शवविच्छेदन करून गडचिरोली वरून रात्री घरी परत येतांना ही ट्रक वाहतूक चालूच होती,उलट रात्री २ वाजता कंपनीचे २ मध्यस्थ घरी येऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत होते,५ लाख रुपये नगदी तथा २ मुलांना सुरजागड प्रकल्पात नौकरी देण्याचे आमिष दाखवून हे प्रकरण शांत करण्यासाठी दबाव टाकण्यात आले असल्याची हकीकत सांगितली.
परंतु ही घटनेला २० दिवस उलटले तरी अद्यापही मुलांच्या नौकरीसाठी साधे कागदपत्रे सुरजागड कंपनीने घेतले नाही,आमची फसवणूक होऊ देऊ नका,आम्हाला न्याय मिळवून द्या.. अशी मागणी यावेळी जयधर कुटुंबियांनी राजे यांच्याकडे केली..!!
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सर्व घटना शांत चित्ताने ऐकली,यावेळी बोलतांना ह्या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत,मी जयधर कुटुंबियांवर अन्याय होवू देणार नाही,मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,मी निश्चितपणे वरिष्ठ स्थरावर प्रयत्न करून तुम्हाला न्याय मिळवून देतो अशी ग्वाही राजे साहेबांनी भेटी प्रसंगी दिली.
एटापल्ली मार्गावर मागे १ अपघात झाला आणि मी पालकमंत्री असतांना जनभावनेचा आदर करीत लगेच तब्बल १ वर्ष कंपनी बंद केली होती,आज तसे का होत नाही,लोकप्रतिनिधी गप्प का बसले आहेत?असा सवाल राजेंनी केला.तसेच सुरजागड कंपनीबाबत जनतेच्या असंख्य तक्रारी माझ्याकडे येत आहे,हे सर्व पाहून इतर नेत्यांप्रमाणे मी शांत बसू शकत नाही, जनतेच्या हितासाठी जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असे प्रतिपादन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी कांचनपूर गावकऱ्यांशी बोलतांना केले..!!
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती बासू मुजुमदार, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, सुभाष सरकार, रत्नेश बाईन, दयाल मंडल, सुशांत समदार, प्रांतोष बिस्वास यांच्या सह कांचनपूर येतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.