नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली:-शिक्षक भरती शासन मान्य संघटना तालुका साकोली च्या वतीने शिक्षक बंधू-भगिनींचा मेळावा 15 ऑक्टोबर 2022 रोज शनिवारला नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष श्री राजेंद्र झाडे.तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,नागपूर विभागाचे अध्यक्ष भाऊराव पत्रे ,नागपूर शहर अध्यक्ष विलास गभने,डॉ.अशोक कापगते
प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष दिनेश पिकलमुंडे, विभागीय संघटक प्रवीण गजभिये, मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह सुभाष चवडे,श्री खुशाल शेंडे,मुख्यध्यपिका सौ .छाया तिडके,स्वागताध्यक्ष एच.आर.हारगुडे ,प्रा.विनोद हातझाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आधुनिक विद्येची देवता व संघटनेचे प्रेरणास्थान सावित्रीबाई फुले तसेच माजी राष्ट्रपती स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यता करून झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी यांनी शिक्षकांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली
प्रमुख समस्या व चर्चा
जुनी पेन्शन योजना ,संच मान्यत वर्ग तुकडी नुसार देण्यात यावी, शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांची पद भरती करावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे, ग्रामीण भागातील शाळा बंद करू नयेत, शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्त करावे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी ,अनुदानित शाळा बंद होण्यापासून वाचविणे, नवीन इंग्रजी शाळांना परवानगी देऊ नये यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक बंद उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन,तालुका कार्यवाह धनंजय तुमसरे तर आभार तालुकाध्यक्ष नंदकिशोर क्षीरसागर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सचिन तिडके ,डी डी मसराम ,तालुका संघटक एम एस सुरसावत, महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुधा हारगुडे, तालुका संघटक आर के भालेराव ,सहकार्यवाह टी एन मस्के ,कार्यकारणी सदस्य एल एस गहाने, श्री एस आर भेडारकर, श्री आर सी बडोले ,श्री एस एल पारधी ,श्री मांढाळकर, श्री रवींद्र कापगते, श्री अण्णा कापगते, श्री एम आर चिचमलकर, श्री प्रशांत कापगते श्री एस आर देशमुख ,श्री एच एस सिंगनजुडे,प्रा.नमित खुणे प्रा. रंजीत सुतार प्राध्यापिका शालिनी कापगते , प्रा. दीपक गहाने यांनी केले आहे