सामान्य रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड.. — नेट बंदमुळे city scan Report,24-24 तास उशीरा … — पर्यायी व्यवस्था सोपी,पण प्रशासनाचा टेक्निकल विभाग झोपेत.:- राज बन्सोड यांचा आरोप…

ऋषी सहारे 

    संपादक

गडचिरोली : दि. 15 सप्टेंबर रोजी प्रितेश अंबादे यांचा सिटी स्कॅन केल्यानंतर 17 तारखेपर्यंत रिपोर्ट प्राप्त झाली नाही.गंभीर रुग्णांचे कधी काय होईल सांगता येत नाही,असे असतांना सिटीस्कॅन रिपोर्ट तात्काळ देण्याची सुविधा सामान्य रुग्णालयात नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आणि नागरिकांत भावना व्यक्त होत आहेत की,असा गंभीर प्रकार रुग्णांना मरणाच्या दारात ढकलणारा आहे.

          आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी याबाबत विचारणा केली असता इंटरनेट बंद असल्याने रिपोर्ट आला नाही असे उत्तर संबंधित कर्मचाऱ्यांनी दिले.

       जर एखाद्या पेशंटला गंभीर इजा असेल,त्याला तातडीच्या उपचाराची गरज असेल आणि 24-24 तास जर रिपोर्ट नेट मुळे उशीरा येत असेल तर रुग्णांना जिव सुद्धा गमवावा लागू शकतो.हे तर त्या पेशंटच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जर प्रशासनाकडून अशी हेळसांड होते तर सामान्य जनतेचे काय हाल असतील?असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

     महत्वाचे म्हणजे जर इंटरनेट चीं ब्रॉडबॅण्ड सेवा काही कारणास्तव बंद जरी असेल तरी 200-300 रु. मध्ये नेट कनेक्टर च्या माध्यमातून मोबाईल वरून सुद्धा इंटरनेट चालू करता येतो आणि ही बाब अत्यंत सोपी सोयीस्कर असून सुद्धा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही.म्हणजे टेक्निकल विभाग झोपेत आहे का?

          टेक्निकल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.

        आणि ताबडतोब usb नेट कनेक्टर लावून पर्यायी रुग्णांची हेळसांड थांबवावी अन्यथा कार्यालयाला घेराव घालण्यात येईल.असा इशारा राज बंसोड जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी गडचिरोली यांनी दिला आहे.