पिक विमा भरुनही शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित :- शुभम गजभिये..

तालुका प्रतिनिधी चिमूर..

       चिमूर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होऊन दोन महीने उलटुन गेले तरी शेतकऱ्यांच्या अकाऊंट मध्ये पीकविमा कंपन्याकडून रुपये जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमधे नाराजी दिसत आहे. 

       प्रत्येक वर्षी पिकविमा भरुनही शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहतो आहे.पिकविम्याचे पैसे घेऊन पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत.

        तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे.त्यामुळे पीक विमा भरुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

       लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत अशी मागणी युवक काँग्रेस कार्यकर्ते शुभम गजभिये यांनी केली.

       अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांचे पंचनामे होऊन दोन महीना होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा कंपन्याकडून पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमधे नाराजी दीसत आहे.

       शेतकरी पीक विमा भरत असतानाही तालुक्याला नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवच म्हणून विमा कंपन्याच्या उल्लेख होतो.मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

     शेतकऱ्यांना पीक वीमा मिळेल अशा घोषणा केल्या होत्या.मात्र त्या घोषणा वाऱ्यावर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.