गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत केवळ कुटनीतीचे राजकारण…. — त्यात आम्ही ( भारतीय जनता ) कुठे?  — भाग — ( 4 – B )

        विसाव्या शतकातील जागतिक रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती नकोच. म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती….

        “अमेरिकेने मेक्सीकोजवळच्या दुर्गम भागात जिथे मानवी वस्ती नसेल,अशा 350 किलोमीटरच्या परिघात एकही मानवीवस्ती नसलेल्या दुर्गम भागाची या “मॅन हॅटन प्रोजेक्ट “साठी निवड केली. अत्यंत गुप्तपद्धतीने हे काम जवळपास तीन वर्षे 1942 ते 1945 पर्यंत चालले.

          युरेनियम आणि प्लेटोनियम पासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे अणुबॉम्ब बनविण्यात आले.त्याची 16 व 18 जुलै 1945 रोजी यशस्वी चाचणी त्या दुर्गम भागात घेण्यात आली. तीन वर्षानंतर या कामात यश आले.

          तरी सुद्धा हे सर्व कार्य अत्यंत गुप्त पद्धतीने अमेरिकेचे काम चालू होते.या दोन्ही बॉम्बचा वापर शेवटी 6 आणि 9 ऑगस्ट रोजी जपानच्या हिरोशीमा आणि नागासाकी या दोन शहरावर टाकून करण्यात आला.तेंव्हा कुठे पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटास सुरुवात झाली.

          कल्पना करा,जर प्रथम ज्याच्या मेंदूत या अतिविनाशकारी बॉम्बची कल्पना आली,त्यात हिटलर यशस्वी झाला असता तर..

      आज हिटलर ऐवजी जगाने आत्महत्या केली असती…

        नैसर्गिक नियतीला हे मान्य नसते. म्हणून हिटलरच्या आत्महत्येने आणि जपानच्या पराभवामुळे दुसरे महायुद्ध संपले.यात साढेपाच कोटी सैनिक आणि निरपराध जनतेचे बळी गेले.वित्तहानी अमर्याद झाली.इंग्लंडची सुद्धा मोठ्याप्रमाणावर कंबरडे मोडल्यामुळे त्यालाही वसाहतीवर राज्य करणे अवघड झाल्यामुळे आणि वसाहतींमधील स्वातंत्र्यसैनिकांनी उठाव केल्यामुळे त्यांना स्वतंत्र करण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.तेंव्हापासून इंग्लंडच्या ताब्यातील अनेक लहानमोठे देश स्वतंत्र होऊ लागले.आपला भारतही त्यापैकी एक होता.

          त्याचबरोबर जागतिक पातळीवर पुन्हा एकदा राष्ट्रसंघाच्या धर्तीवर जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले.इंग्लंड, अमेरिका,फ्रांस,चीन आणि रशिया ही पाच स्थायी सदस्य असलेली आणि इतर अनेक ( 64 )देश अस्थायी सदस्य असलेली,”संयुक्त राष्ट्र संघटनेची “स्थापना 24 आक्टोबर 1945 रोजी झाली.आणि तीने पुढे 10 डिसेम्बर 1948 रोजी “जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा ( ज्याची 30 कलमे आहेत ) घोषित केला.या जाहीरनाम्यातील तिसही कलमे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे तिथे भारताच्या संविधानातून अधोरेखित झालेली आहेत….. 

          असे म्हणतात की, जेंव्हा ज्या शास्त्रज्ञानी या अणुबॉम्बची निर्मिती केली आणि या अणुबॉम्बचा विनाश प्रत्यक्ष बघितला.त्या शास्त्रज्ञानी याच युनोच्या महासचिवाला 100 शास्त्रज्ञानाच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र लिहिले,ज्यात स्पष्ट उल्लेख होता की,यापुढे जर अणुबॉम्बची निर्मिती आणि अंमलबजावणी जगाने केली,तर यापुढे चौथे जागतिक महायुद्ध कधीही होऊ शकणार नाही.कारण तिसऱ्या महायुद्धातच सर्वकाही संपेल……!

        हे पत्र आजही युनोच्या महासचिवालयात आहे.या पत्राच्या इशाऱ्यानंतर सुद्धा आज 2024 रोजी जगाने गुप्त व उघडपणे 23 हजार अणुबॉम्बची निर्मिती केलेली आहे…

         याचा अर्थ स्पष्ट आहे की,आमची पृथ्वी या 23000 अणुबॉम्बच्या टांगत्या झोक्यावर झोके घेत आहे,ती दोरी कधी तुटेल याचा नेम नाही.विशेष म्हणजे या 23000 अणुबॉम्बमधील प्रत्येक बॉम्ब हा हिरोशीमा,नागसाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 500 पटीने विनाशकारी आहे….

       आता तुम्हीच कल्पना करा….

    हे एवढे बॉम्ब एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 17 वेळा पृथ्वीला नष्ट करू शकतात,एवढी शक्ती यांच्यात आहे….

        परंतू,ज्या अणुबॉम्बमध्ये पृथ्वीला 17 वेळा नष्ट करण्याची शक्ती आहे.

  त्या अणुबॉम्बला नष्ट करण्याची शक्ती…….

 भारताच्या संविधानात आहे….. 

           म्हणून एवढ्या मोठ्या शक्तीला समजून घेण्यासाठी संविधानातून जागृती आणि तीचा अविष्कार करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांने जाती -धर्माच्या व राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे… 

          अन्यथा रशिया,उत्तर कोरियाची खुमखूमी हिटलरप्रमाणे वर येऊन जगाला कधी संपवेल याचा नेम नाही…….

      त्यासाठी भारताने जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या नादी न जगात भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशात आणि जगात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करून तथागतांचा शांतीचा संदेश पोहोचवावा. जगाच्या शांततेचे नेतृत्व क्रमांक एक राहून स्वीकारावे….

      तेंव्हा कुठे एकविसाव्या शतकात विसाव्या शतकातील जागतिक रक्तरंजित इतिहासाची पुनरावृती होणार नाही….

          जागृतीचा लेखक

              अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, औरंगाबाद ,रेणापूरकर, 7875452689..