धानोरा /भाविक करमनकर 

 

 

 विश्वकर्मा जयंती निमित्त धानोरा आयटीआय मध्ये दीक्षांत समारंभ रोज शनिवारला दिनांक 17 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. या  कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश रामटेके वरिष्ठ निर्देशक उद्घाटक संकेत बी मशाखेत्री (एम टेक आयआयटी मद्रास रूयान डिक्स अमेरिकन सीड कंपनी) यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आलाा. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सौ रश्मी डोके प्राचार्य जिल्हा परिषद धानोरा तर प्रमुख पाहुणे म्हणून मिथुन मशाखेत्री (उद्योजक कोड सॉफ्ट लिमिटेड पुणे )हे होते.तसेच अक्षय पि. साहारे इंजिनियर नरेश बांबोडे अध्यापक आता कार्याध्यक्ष प्रोटॉन संघटना गडचिरोली हे होतेे. वरिष्ठ लिपिक सौ ज्योती मोगटेवार उपस्थित होते. हा कार्यक्रम धानोरा आयटीआयचे प्राचार्य एम बी लोणी एस ए रामटेके कनिष्ठ लिपिक तथा भांडारपाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलाा. औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा येथून प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय पदवी मेडल व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला.

       उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील निर्देशक के डी जांभुळकर जी के सावरकर ए पी मशाखेत्री चांदेवार सर नुत्तीवार मॅडम पी एस टेंभुर्णे एन एन मोहुरले कुमारी के एस नरोटे दाशाबाई कुमरे पुष्पाबाई कुटांगले अभय राऊत साईनाथ वाघाडे रमेश सहारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन नुतिवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहुर्ले सर यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com