कमलसिंह यादव

पारशिवनी/नागपूर ग्रामीण प्रतिनिधी..

 

पारशिवनी :-रामटेक ,मनसर,माहुली,नयाकुंड,पारशिवनी मार्गाने धावणारी बस,खेडेगावातंर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थांना घेऊन जाणारी बस आज सकाळी साडेसातच्या दरम्यान बस स्थानकावरील खड्यात फसली,या घटनाक्रमातंर्गत संबंधित परिवहन प्रशासनाने चूपी साधली असल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र विद्यार्थ्यांना सदर घटनाक्रमाचा फटका बसल्याचे चित्र आहे.सदर बसचा क्रमांक एम.एच. ४० वाय.५२२८ असा आहे.

उमरी पाली,माहुली,काळापाठा येथील विद्यार्थ्यांना आणणारी बस पारशीवणी व बाबुलवाडा येथील शाळेत विद्यार्थाना सोडते.आज गटग्रामपंचायत माहुली जवळ काळापाटा गावातील बसस्टाप जवळ ठिक ठिकाणी गड्डे पडले असुन,त्या खड्ड्यात पाणी साचुन राहते‌.तद्वतच सदर परिसरातील चिखलग्रस्त भाग झाला असल्याने बस अनियंत्रित होऊन काळापाटा बसस्टापच्या परिसरात खड्यात खाली उतरली. मात्र, बसमधील ५० विद्यार्थी थोडक्यात बचावली.

काळापाटा रस्तावर ठिक ठिकाणी खड्यात पानी जमा असुन काळापाटा माहुली ग्राम पंचायतीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सदर समस्या मनावर घेतले पाहिजे,असा सुर परिसरातील नागरिकांचा आहे.

संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज मोठी दुर्घटना होताना वाचली.आज विद्यार्थी थोडक्यात बचावले असून,यापुढे असे अपघात घडू नये याकरिता ग्राम पंचायत,बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन काळापाठा बसस्टाप परिसरातील रस्त्यावरील चिखलाचा बंदोबस्त करावा,अशी मागणी काळापाटा वरून बाबुलवाडा शाळेत जाणारे विद्यार्थी – विद्यार्थीनी व त्याचे पालक आणी काळापाटा गावातील नागरिक यांनी केली आहे.

अन्यथा आठवडाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालक व गावकरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी दिला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News