दि.१७ सप्टेंबर ०२२

 

सावली (सुधाकर दुधे)

 

 भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड खुर्द येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करतांना या देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. असे प्रतिपादन या प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.

 

या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,महामंत्री सतीश बोमावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, माजी बांध. सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार,माजी.जि.प.सदस्या योगिताताई डबले,माजी.पं.स.गणपत जी कोठारे, ज्येष्ठ नेते प्रकाश पा.गडमवार,कुनघाडकर सर,ओबीसी तालुका अध्यक्ष कवींद्रजी रोहनकर,माजी.सभापती कृष्णाभाऊ राऊत,मोहन चन्नावार,मोतीराम चिमुरकर,युवा नेते किशोर वाकुडकर,निखिलजी सुरमवार, नामदेव भोयर, जितू सोनटक्के,मुकेश बिके,दिवाकर गेडाम,तुळशीदास भुरसे,प्रदीप कुकुडकर,मनोहर कांबळे,विकास कोहळे, किरण सुरजागडे,रमेश नापे, लोकनाथ रायपुरे,रोशन गुरुनुले, लखन नापे,

तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

युवकांनी उत्स्फूर्तपणे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन…

स्फुर्तपणे,उत्साहाने,आनंदाने युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com