दिनांक : १७ सप्टेंबर २०२२, शनिवार…
सावली (सुधाकर दुधे)
तालुक्यातील पेठगाव येथील श्री मुकरू तुळशीराम गेडाम, वय २७ वर्षे यांचे चकपिरंजी येथे मरणासाठी जात असताना अपघाती निधन झाले. त्यांच्या पाठीमागे एक चार वर्षे व तीन वर्षे दोन मुले असून त्यांना आधार देण्यासाठी आता कोणीच उरलेला नाही. या मुलांची पालनपोषण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी कोणीच पुढे आलेले नाही.
त्यामुळे सर्वांसमोर पेच प्रसंग निर्माण झाला. अश्या परिस्थिती मध्ये ही बातमी काँग्रेस कमिटीला कळविण्यात आली. ही बातमी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पर्यंत ही बातमी पोहचविण्यात आली. त्याची दखल घेत भाऊंनी तात्काळ मदत पोहचविण्याचे आश्वासन देण्यात आले. व हि मदत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देण्यात आली.
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र यांनी समस्त कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना केली असून आर्थिक स्वरूपाची मदत पोहचविण्यात आली आहे. ही मदत पेठगाव गावचे प्रथम नागरिक सौ वर्षा गेडाम यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नितीनजी गोहणे, सौ वर्षा गेडाम सरपंच, श्री शरद गेडाम माजी उपसरपंच, श्री अनिल म्हशाखेत्री संजय गांधी निराधार सदस्य, श्री पुरुषोत्तम चुदरी अध्यक्ष सरपंच संघटना सावली, व अन्य काँग्रेस कार्यकर्ते होते.