अनिलकुमार एन,ठवरे
तालुका प्रतिनिधी आरमोरी
देलनवाडी :- कुठल्याही प्रकारची नशा असो तो आपल्या आरोग्यास घातक असतो.या दृष्टीने मुक्तीपथच्या वतीने विविध मार्गातून जनजागृती करण्यात येत आहे.जनमानसात आरोग्याविषयक जागरूकता निर्माण व्हावी व खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने गाव समिति आणि मुक्तीपथ चम्मू आरमोरी व वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन फार मुक्तीपथ’मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे या स्पर्धेस बालगोपाल ते आबालवृद्ध या सर्वांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेची सुरुवात तं.मु.स.अध्यक्ष श्री.हरबाजी घोडमारे यांचे हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करून ती सर्व स्पर्धकांच्या हातून फिरवून करण्यात आली.यातील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
तद्नंतर सभा घेऊन त्यामध्ये मुक्तीपथचे कार्य व नशामुक्ती याविषयी भारती उपाध्याय तालुका संघटक वडसा तसेच विनोद कोहपरे तालुका संघटक आरमोरी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी देलनवाडीच्या प्रथम नागरिक सौ.शुभांगी मसराम,निमंत्रिका सौ.कोमल धुर्वे,अनिलकुमार ठवरे, ग्रा.पं.स.मनोज अंबादे, भरारी प्रभास संघ अध्यक्षा सौ.अश्विनी ठवरे,व्यवस्थापक सौ.पल्लवी कुमरे,आय. सी.आर.पी. कल्याणी गेडाम व इतर मान्यवर उपस्थित होते.
वरील कार्यक्रमास अनुप नंदगीरवार उपसंघटक वडसा,पल्लवी मेश्राम व सुषमा वासनिक यांचे विशेष सहकार्य लाभले.