मंगेश रणदिवे: शहर प्रतिनिधी
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालीत डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील रोजगार विभागा (Employment Cell) तर्फे ‘रोजगार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर चर्चासत्र दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री. स्वप्नील गोपाले (PSI) रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर, श्री. श्रीकांत झाडे, संचालक अॅस्पायर शिक्षण अकादमी चंद्रपूर, व आय. क्यु. एसी. समन्वयक डॉ. परमानंद शेंडे उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी विद्यार्थ्याना विविध क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध असल्याचे अवगत करून दिले. तसेच विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेची सुरुवात महाविद्यालयीन शिक्षण घेतांना करावी असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. स्वप्नील गोपाले (PSI) यांनी आपला जीवन प्रवास कथन करून विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना इतर विभागाच्या ज्या काही परीक्षा असतात त्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे भाष्य केले. तसेच श्री. श्रीकांत झाडे, यांनी विद्यार्थ्याना शासकीय नोकऱ्या सोबतच खासगी नोकऱ्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यानी येणाऱ्या काळाचा अंदाज घेऊन स्वत: स्पर्धेसाठी तयार करावे. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना रोजगार विभागाचे समन्वयक प्रा. किशोर महाजन यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नंदकिशोर रंगारी तर आभार प्रा. जगदीश चिमूरकर यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बहूसंखेने उपस्थित होते.