रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- स्थानीक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे डॉ.एस.आर.रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला.
वर्तमानकालिन महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलच्या जगापासून दूर जाऊन पुस्तकाकडे वळला पाहीजे,दररोज ज्ञानात भर टाकली पाहिजे.ज्ञानवंत पिढीच चांगले राष्ट्र घडवू शकते,त्यासाठी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करणे,वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालय दिनाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले उपस्थित होते. त्यांनी व मुख्य अतिथींनी ग्रंथालयातील नवी दुर्मिळ पुस्तकांची पाहणी केली.
या प्रसंगी कु.प्रिया काळे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण चिमूर तसेच श्री किशोर देऊळकर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक चिमूर,वनपाल एस.एम. मडावी,वनरक्षक कु.शितल मडावी हे प्रमुख अतिथी होते.
या प्रसंगी गांधी सेवा शिक्षण समिती सचिव प्रा. विनायकराव कापसे,कोषाध्यक्ष प्रा.मारोतराव भोयर उपस्थित होते.प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.प्रफुल्ल बन्सोड मराठी विभागप्रमुख,डॉ कार्तिक पाटील, डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.किशोर चटपकार हे उपस्थित होते.
ग्रंथपाल डॉ.शैलेश भोयर, ग्रंथालय कर्मचारी पंकज शिरभय्ये,सौ.हिना राऊत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमा करिता विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.