दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संकुलात रक्षाबंधन उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दिपक पाटील, राजेंद्र नहार, चंद्रकांत भालेराव, मुंडे कामिनी, कुटे सिंधू, साळवे अनुजा, किरण कडू, संतोष इंगळे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी नाती जपण्याचा संस्कार शाळेत व्हावा म्हणून रक्षाबंधन उपक्रम राबविला जातो. प्रास्ताविकातून बहीण भावाच्या नात्याचे महत्व सांगितले. प्रशालेतील दिव्यांग विभागाच्या मुलींनी इ.४ थीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व इतर वर्गातील विद्यार्थिनींनी स्वतः बनविलेल्या राख्या विद्यार्थांना बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. परंपरेनुसार गेली २५ वर्षे हा कार्यक्रम प्रशालेत साजरा केला जातो.
सचिव अजित वडगावकर यांनी अंध विभागाच्या मुली त्यांच्या कुटुंबापासून शिक्षणासाठी दूर राहतात म्हणून या उपक्रमातून त्यांना राखी बांधण्याची संधी मिळते.
खजिनदार डॉ.दिपक पाटील यानी प्रशालेच्या विद्यार्थीनीनी स्वतः राख्या बनवून विद्यार्थांना बांधल्या याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बहिणींनी भावाला राखी बांधणे ही आपली परंपरा आहे व आपल्याला बांधलेल्या राखीच्या बंधनाचा आपण आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल चव्हाण व वैजयंता गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा काळे,निशा कांबळे,वैशाली शेळके दिपाली रासकर,सुनिता गिरी, मीनाक्षी काकडे यांचे सहकार्य लाभले.